Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारत सरकारने ६ जून हा दिवस राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर करावा...

भारत सरकारने ६ जून हा दिवस राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर करावा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांची मागणी

विश्वातील मानाची ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी

शिवजयंती महोत्सव समितीचा अभिनव उपक्रम : सलग १४ व्या वर्षी शिवराज्याभिषेक तथा सार्वजनिक शिवस्वराज्य दिन सोहळा साजरा

 

पुणे : शिवस्वराज्य दिन चिरायू होवो.. शिवराज्याभिषेक दिन चिरायू होवो… जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा गगनभेदी जयघोषात, रणशिंगाच्या ललकारीत, मर्दानी खेळाच्या चित्तथरारात आणि ढोलताशाच्या गजरात शिवाजी नगर पुणे येथील एसएसमीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकाचा आणि विश्वातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पाचा परिसर शिवभक्तांनी दणाणून सोडला. यावेळी शिवजयंती महोत्सव समिती तर्फे रयतेच्या “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” सोहळ्या निमित्त भगव्या स्वराज्यध्वजा सह ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. सोहळ्याचे हे सलग १४ वे वर्षे आहे.

 

यावेळी रिंकल अमित गायकवाड, ललिता रवींद्र कंक, प्रिया मोहन पासलकर, दिपाली विशाल गव्हाणे, अश्विनी दरेकर, कामिनी प्रवीण गायकवाड तसेच उपस्थित महिलांच्या हस्ते भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे विधीवत पुजन करुन ५१ फूट स्वराज्यगुढी उभारण्यात आली. शिवकालीन सरदारांचे वंशज, सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, समितीचे उपाध्यक्ष रवींद्र कंक, शंकर कडू, प्रवीण गायकवाड, सुनील जगताप, अजित शिंदे, मोहन पासलकर. महेंद्र भोईटे, जयेश निंबाळकर यांसह सर्व स्वराज्य घराणी, महिलावर्ग उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात शिवरायांच्या विश्वातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पाचे पूजन करुन झाली. त्यानंतर शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. शिवजयंती प्रमाणे शिवराज्याभिषेक दिन ६ जून हा सार्वजनिक शिवस्वराज्य दिन वैश्विक साजरा व्हावा ह्या प्रेरणेतून ६ जून २०१३ ला शिवरायांच्या जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्य चिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सर्वप्रथम दुर्गदुर्गेश्वर रायगड, लालमहाल, राजगड यासह असंख्य ठिकाणी उभारुन “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. अमित गायकवाड यांनी सात्यत्याने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत २०२१ सालापासुन ग्रामविकास खात्याने तसेच उच्च व तंत्र खात्याने शासकीय परिपत्रक काढून महाराष्ट्रातील ३३ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या आणि सुमारे ४३,००० गावांत त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील सर्व अकृषीक, अभिमत, स्वयंअर्थसाहाय्यिक विद्यापीठ, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतने आणि तत्सम शिक्षण संस्थामंध्ये हा दिवस “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” स्वराज्यगुढी उभारुन साजरा करण्यास सुरुवात केली.

 

सोहळ्याच्या १४ व्या वर्षात आता प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, शहरात, महाविद्यालयात, राज्यात तसेच देशविदेशात “सार्वजनिक शिवस्वराज्य दिन” स्वराज्य गुढी उभारुन साजरा केला जात आहे. हा दिवस भारत सरकारने “राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन” म्हणून जाहीर करुन शिवरायांना देशस्तरीय मानवंदना द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

 

पुण्यामध्ये दरवर्षी एसएसपीएमएस लालमहाल, छत्रपती संभाजी महाराज स्मारक संभाजी महाराज उद्यान,चंद्रमौलेश्वर मंदिर यासह अनेक ठिकाणी स्वराज्य गुढी उभारली जाते. त्याच बरोबरीने यावर्षी शिवकालीन सरदारांच्या वंशजांकडून शिवनेरी, राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड, संग्रामदुर्ग यासह ३५१ गडांवर तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ, लक्ष्मीबाई दत्त मंदिर यासह ३६० गणेशोत्सव मंडळानी देखील स्वराज्यगुढी उभारुन सार्वजनिक शिवस्वराज्य दिन साजरा केला.

 

कार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे प्रवर्तक अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, प्रवीण गायकवाड, गोपी पवार, मोहन पासलकर, महेंद्र भोईटे यांसह असंख्य स्वराज बांधवांनी

केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments