Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedएसआयआरबाबत पुणे कँन्टोन्मेन्ट विधानसभा मतदारसंघात प्रशिक्षण संपन्न*

एसआयआरबाबत पुणे कँन्टोन्मेन्ट विधानसभा मतदारसंघात प्रशिक्षण संपन्न*

 

 

पुणे, दि. 24: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोत पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे कँन्टोन्मेन्ट विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक आणि सर्व अतिरिक्त मतदार नोंदणी अधिकारी यांचे प्रशिक्षण नूर बस्सम हॉल, बंडगार्डन येथे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी घेतले

 

श्री भंडारे म्हणाले, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत बीएलओ घर-घर जाऊन प्रगणना प्रपत्र वितरित करीत आहेत. सर्व पात्र मतदारानी आवश्यक माहिती व आवश्यकतेनुसार संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून देऊन भरलेले प्रगणना प्रपत्र शक्य तितक्या लवकर संबंधित बीएलओकडे जमा करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

 

मतदारांनी प्रगणना प्रपत्रावरील छापील माहितीची पडताळणी करावी. आपला अचूक मोबाईल क्रमांक नमूद करावा. कुटुंबातील सदस्यांचे मॅपिंग चुकीचे असल्यास किंवा इतर कोणतीही विसंगती आढळल्यास त्याची माहिती त्वरित बीएल ऑना द्यावी. कोणतीही अनोमली असल्यास त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रे बीएलओकडे सादर करावीत, जेणेकरून सुनावणीदरम्यान त्यावर तातडीने कार्यवाही करता येईल. अद्ययावत व अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी सर्व नागरिकानी या विशेष मोहिमेस यहकार्य करावे. अधिक माहितीसाठी किंवा मदतीकरिता संबंधित बीएलओ अथवा निवडणूक नोंदणी अधिकारी कार्यालयाशी मतदारांनी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. भंडारे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments