Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे नवरात्र उत्सव मंडळांकरिता स्पर्धा*  यंदा प्रथमच...

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे नवरात्र उत्सव मंडळांकरिता स्पर्धा*  यंदा प्रथमच आयोजन ; विनामूल्य प्रवेश ; एकूण ७५ हजार रुपयांपेक्षा अधिक पारितोषिके 

 

 

पुणे : नवरात्रोत्सवात पुणे शहरात अनेक नवरात्र उत्सव मंडळे धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिकता जपतात. तसेच उत्सवामध्ये विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम देखील राबविले जातात. अशा पुणे शहरातील नवरात्र उत्सव मंडळांकरिता ‘श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग-नवरात्रोत्सव स्पर्धा’ यंदा प्रथमच आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल तसेच प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली.

 

स्पर्धेकरिता प्रवेश विनामूल्य असून पुणे शहर स्तरावरील नवरात्र उत्सव मंडळे यामध्ये सहभागी होऊ शकतात. उत्सवकाळासह वर्षभरात मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे परीक्षण केले जाणार आहे. याकरिता परीक्षण मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये ट्रस्टचे विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी यांसह ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असणार आहे.

 

स्पर्धेत प्रथम येणाऱ्या मंडळास रुपये २१ हजार आणि सन्मानचिन्ह, द्वितीय मंडळास रुपये १५ हजार आणि सन्मानचिन्ह तर तृतीय येणाऱ्या मंडळास रुपये ११ हजार आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय तीन उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविणाऱ्या मंडळांना प्रत्येक रुपये ५ हजार आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल. अशी एकूण ७५ हजार रुपयांपेक्षा अधिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. मंडळांनी स्पर्धेतील सहभागाकरिता ७७७००७६७६७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments