Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रलंबित आधार अर्ज तातडीने निकाली काढण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश*

प्रलंबित आधार अर्ज तातडीने निकाली काढण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश*

 

 

पुणे, दि. २४ : जिल्ह्यातील आधार नोंदणी व अद्ययावतीकरण प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आधार नियंत्रण समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी प्रलंबित अर्जांचा निपटारा, विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अद्ययावतीकरण आणि आधार सेवांमधील विविध सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली.

 

जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस समितीचे सदस्य, उपजिल्हाधिकारी तथा आधार नोडल अधिकारी, सदस्य सचिव तहसीलदार संजय गांधी योजना शाखा तथा सहायक नोडल अधिकारी (आधार) आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीत आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘स्टेट पोर्टल’वरील ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित असलेले अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आधार माहिती अद्ययावत राहावी यासाठी ५ ते १५ वर्षे आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावतीकरण शिबिर मोहिमेच्या स्वरूपात आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आधारसंदर्भातील तक्रार निवारण प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला.

 

आधार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांबाबत करण्यात आलेल्या बदलांची माहिती यावेळी देण्यात आली. यामध्ये परदेशी नागरिकांच्या ईएफआरओ (eFRO) कागदपत्रांतील बदल, घटस्फोट प्रकरणात नाव बदलासाठी छायाचित्राशिवाय Divorce Decree स्वीकारणे तसेच विवाहानंतर महिलांच्या आधार कार्डावरील जन्मतारीख दुरुस्तीसाठी जन्म दाखला आणि विवाह दाखला ग्राह्य धरणे यांचा समावेश आहे.

 

याशिवाय, mAadhaar App च्या माध्यमातून ई-मेल अद्ययावत करण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

बैठकीत आधार सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments