Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedरांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज...

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुणे : सिंहाशी झुंज देताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, त्यांचे बंदिवासातील प्रसंग, मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचे वर्णन करणाऱ्या रांगोळ्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची एकत्रित रांगोळी तसेच राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील वात्सल्यपूर्ण नात्याचे दर्शन घडविणाऱ्या आकर्षक रांगोळ्यांनी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रांगोळी प्रदर्शनात पुणेकरांचे लक्ष वेधले.

 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध छटा उलगडणारे आकर्षक रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष पियुष विजयकुमार शहा, उपाध्यक्ष निलेश खाणेकर, जनहित चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश ढमढेरे, उत्सव प्रमुख रोहन जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. श्रीरंग कलादर्पण च्या रांगोळी कलाकारांनी रांगोळ्या काढल्या.

 

रांगोळी प्रदर्शनामध्ये संभाजी महाराजांचा जन्म, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची एकत्र रांगोळी, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक, तसेच महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचे दर्शन घडविणाऱ्या विविध रांगोळ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या रांगोळ्यांमधून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे विविध पैलू उलगडण्यात आले आहेत.

 

याचबरोबर दिवसभर महिला स्वच्छतादूत भगिनींसाठी ब्रेस्ट कॅन्सर शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच ईसीजी, सीबीसी, मधुमेह, रक्तदाब, दंत तपासणी आदी विविध तपासण्यांसह आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्ताचा प्रत्येक थेंब अमूल्य असल्याचा संदेश देत भव्य रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते. गोशाळांना गोधनाच्या खाद्यस्वरूपात मदत करण्यात आली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments