Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.... 

महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…. 

 

 

 

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक एकता,न्याय व शिक्षणाच्या व्यापक विचारांचा वारसा भावी पिढ्यांनी जोपासावा – उपमहापौर शर्मिला बाबर

 

 

 

पिंपरी, दि. २६ जून २०२६ : राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक एकता, शिक्षण,न्याय व मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आणि त्यांचे व्यापक विचार आजही दिशादर्शक व प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा वारसा भावी पिढ्यांनी जोपासावा असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

 

 

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस तसेच पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या.

 

 

 

महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील झालेल्या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य कुशाग्र कदम,नगरसदस्या अनुराधा गोरखे,उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले, सुनील पाटील, मिलिंद वेल्हाळ,जगदीश परीट, कृष्णा पाटील, पी बी पाटील, विजयराव नाळे, सचिन साठे उपस्थित होते

 

 

 

यानंतर के.एस.बी. चौक, चिंचवड येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा जागर करत त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

 

 

 

या अभिवादन कार्यक्रमास माजी खासदार अमर साबळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, नगरसदस्य कुशाग्र कदम, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने

उपस्थित होते.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments