पुणे, २८ जून २०२६
आंतरराष्ट्रीय ‘एमएसएमई’ दिनानिमित्त काल शनिवार २७ जून रोजी नवी मुंबई येथील सिडको येथे आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अनंत डिफेन्स सिस्टीम प्रा. लि. चे संस्थापक चेतन धारिया यांना “स्टेट चॅम्पियन्स एमएसएमई ऑफ द ईअर २०२६” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन्मान पत्र आणि रुपये दोन लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
याप्रसंगी श्री सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध लघु, लहान, मध्यम क्षेत्रातील उद्योजकांना वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे दोन हजार उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रमास उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, उद्योग आयुक्त उपस्थित होते. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात योगदान दिल्याबद्दल आभार मानले.
————-


