मुंबई, 29 जून २०२६: आदित्य बिर्ला ज्वेलरी ब्रँड इंद्रियाने नैसर्गिक हिऱ्यांच्या निवडीमध्ये उद्योगातील पहिलाच मापदंड स्थापित केला आहे, यामुळे हिरे खरेदीचा अनुभव अधिक आनंददायी आणि विश्वासार्ह होणार आहे. उत्कृष्ट चमक हीच हिऱ्याच्या गुणवत्तेची सर्वात स्पष्ट अभिव्यक्ती आहे या विश्वासावर आधारित हा दृष्टिकोन ब्रँडच्या सर्वोत्तम निवड मानकांवर तयार करण्यात आला आहे. पारंपारिक ग्रेडिंग मानकांच्या पलीकडे जाऊन हिऱ्याची कटिंग आणि निवडीबाबत इंद्रियाचा दृष्टिकोन हा हिरा किती प्रभावीपणे प्रकाश परावर्तित करतो आणि उत्कृष्ट चमक (ब्रिलियन्स, फायर आणि सिंटिलेशन) देतो, याचे मूल्यांकन करतो. या कठोर मानकांवर ५ पैकी केवळ १ नैसर्गिक हिरा पात्र ठरतो.
हा बदल या क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. जागतिक हिरे उद्योगात भारत हा मुख्य केंद्रस्थानी असून जगातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त हिऱ्यांचे कटिंग व पॉलिशिंग सुरत आणि मुंबईसारख्या भागांत होते. ही सखोल कौशल्ये असूनही भारतात हिऱ्यांच्या दागिन्यांचा वापर अद्याप १५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. योग्य प्रमाण आणि उत्कृष्ट प्रकाश परावर्तन असणाऱ्या हिऱ्यांना प्राधान्य देऊन इंद्रिया देशातील सर्वात चमकदार हिरे समोर आणत आहे, तसेच पारंपारिक 4Cs च्या पलीकडे जाऊन भारतातील ग्राहकांच्या हिऱ्यांचे मूल्यांकन आणि निवड करण्याच्या पद्धती बदलण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
चमकण्यामागील विज्ञान (द सायन्स बिहाइंड द स्पार्कल)
हिऱ्याची स्पष्टता, रंग आणि कॅरेट हे भौतिक गुणधर्म निसर्गाकडून मिळतात, पण त्याची कटिंग ही मानवी कलाकुसर आणि अचूकतेचा परिणाम आहे. हिऱ्यामध्ये प्रकाश कसा प्रवेश करतो, तो आत कसा परावर्तित होतो आणि बाहेर कसा पडतो हे कटिंग ठरवते; ज्यामुळे हिऱ्याची खरी चमक वाढते. उत्तम प्रकारे कट केलेला हिरा प्रकाश परावर्तन जास्तीत जास्त वाढवतो, तर सामान्य कटिंगमुळे प्रकाश बाहेर पडतो, ज्यामुळे हिऱ्याच्या चमकेमध्ये स्पष्ट फरक दिसून येतो.
इंद्रियामध्ये, प्रकाशाच्या कामगिरीच्या (लाईट परफॉर्मन्स) तीन मुख्य पैलूंद्वारे कटिंग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतली जाते: ब्रिलियन्स, फायर आणि सिंटिलेशन. हिरा परिधान केल्यानंतर खरोखर कसा दिसतो, हे या तीन गोष्टींवरून स्पष्ट होते:
· ब्रिलियन्स: हिऱ्याच्या पैलूंवरून परावर्तित होणारा पांढरा प्रकाश.
· फायर: प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगपटांमध्ये होणारे विघटन.
· सिंटिलेशन: प्रकाशाच्या हालचालीमुळे हिऱ्यामध्ये दिसणारी व चमकणारी चमक
या पॅरामीटर्सवर केवळ इंद्रियाच्या कडक मानकांची पूर्तता करणारे, अचूक प्रमाण असलेले, उत्कृष्ट प्रकाश परावर्तन देणारे आणि कमीत-कमी लाईट लिकेज असणारे हिरे निवडले जातात. जवळपास रंगहीन असणारे F–H–G श्रेणीतील हिरे आणि उच्च स्पष्टतेचे टेबल हिऱ्याचे परावर्तन आणखी वाढवतात, ज्यामुळे हिरा परिधान केल्यावर प्रत्येक क्षणी अपवादात्मक चमक मिळते.
ग्राहक आणि भागधारकांना हा फरक प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी इंद्रियाने स्पार्कलस्कोप हे इन-स्टोअर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर केले आहे, जे ग्राहकांना हिऱ्याच्या चमकण्याचे मूल्यमापन करण्यास सक्षम करते. चमक डोळ्यांना दिसेल अशा पद्धतीने मोजण्यायोग्य बनवून हा अनुभव खरेदी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणतो, ज्यामुळे ग्राहकांना इंद्रिया हिऱ्यांचे वेगळेपण पाहणे, समजून घेणे आणि त्यावर विश्वास ठेवणे सोपे जाते.
या नाविन्यपूर्ण उद्योग मानकाच्या सादरीकरणाबाबत मत व्यक्त करत इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली म्हणाले, “हिरे उद्योगाचा विकास होत आहे आणि नाविन्यता काळाची गरज आहे. अनेक दशकांपासून गुणवत्तेचे मूल्यमापन 4Cs वर केंद्रित राहिले आहे, पण शेवटी ग्राहकांना सर्वात जास्त चमकणारा हिरा आवडतो. ही पहिली गोष्ट आहे, जी त्यांच्या लक्षात येते, हा असा गुण आहे जो झटपट लक्ष वेधून घेतो आणि यामुळेच एखादा हिरा खरोखर खास वाटतो. इंद्रियामध्ये, आम्ही हिऱ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी अधिक दृश्यमान, सर्वोत्तम आणि ग्राहक-प्रथम मार्ग ऑफर करून चमक आघाडीवर आणत आहोत आणि त्याच वेळी एक नवीन उद्योग मानक प्रस्थापित करत आहोत. इंद्रियामधील प्रत्येक हिरा त्याच्या उत्कृष्ट चमकण्यासाठी निवडला जातो आणि विविध श्रेणी व प्रसंगांसाठी उपलब्ध आहे. आमचे उद्दिष्ट उत्कृष्ट चमकची उपलब्धता आणि त्याविषयीची समज वाढवणे हा आहे, ज्यामुळे ग्राहकांना सर्वोत्तम आणि सर्वात चमकदार हिरे शोधता येतील.”
आपले मत व्यक्त करत इंद्रियाचे हेड ऑफ सप्लाय चेन श्री. राजेंद्रन गणपती म्हणाले, “इंद्रियामध्ये आम्ही एका साध्या विश्वासाने सुरुवात केली: चमक ही अशी गोष्ट आहे, जी ग्राहकांना सर्वात जास्त आवडते, तर तीच आमच्या हिऱ्यांच्या निवड प्रक्रियेचा मुख्य मापदंड असायला हवी. आमच्या ग्राहकांना सर्वात चमकदार हिरे मिळावेत यासाठी इंद्रिया बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या हिऱ्यांमधून ५ पैकी केवळ १ हिरा काळजीपूर्वक निवडते. याचा परिणाम म्हणजे अपवादात्मक दृश्यमान चमकसाठी निवडलेल्या हिऱ्यांचे कलेक्शन, जे आकर्षक आणि टिकणारा आहे.”
इंद्रिया हा गेल्या तीन दशकांहून अधिक कालावधीत भारतातील बाजारपेठेत प्रवेश करणारा मोठा वारसा लाभलेला पहिलाच ज्वेलरी ब्रँड आहे आणि २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत ८० हून अधिक स्टोअर्सचा टप्पा पार करणारा सर्वात वेगाने वाढणारा रिटेल ब्रँड आहे. ३२,००० हून अधिक डिझाइन्ससह, इंद्रिया कारीगरीला केंद्रस्थानी ठेवून भारतातील व्यक्तींच्या हिरे खरेदीच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचे नियोजन करत आहे, ज्यामध्ये भारतातील कुशल कारागिरांचे असाधारण कौशल्य आणि पिढ्यानपिढ्यांचे ज्ञान प्रतिबिंबित करणाऱ्या परंपरेची प्रभावी रूपे पाहायला मिळतात.
हे लाँच इंद्रियाच्या नवीन ‘स्पार्कल लाइक नो अदर’ मोहिमेद्वारे समर्थित आहे, ज्यामध्ये ब्रँडचा चेहरा अभिनेत्री अदिती राव हैदरी आहेत. ही मोहीम उत्कृष्ट चमकचे आकर्षण वाढवते, जे लक्ष वेधून घेते आणि इंद्रिया हिऱ्यांचे वेगळेपण साजरे करते.
या मोहिमेसह, इंद्रिया मॉडर्न ज्वेलरी डेस्टिनेशन (आधुनिक दागिन्यांचे ठिकाण) म्हणून आपले स्थान दृढ करत आहे, ज्यामध्ये मोहक रोजच्या वापरापासून ते विशेष प्रसंग, सण आणि लग्नाच्या कलेक्शनपर्यंत हिऱ्यांच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. हा ब्रँड हिरे खरेदीसाठी अधिक पारदर्शक आणि अनुभवावर आधारित दृष्टिकोनाला प्राधान्य देताना कारागिरी, नाविन्यता आणि ग्राहक शिक्षण यांना एकत्र आणतो.
ही मोहीम ३६०-डिग्री मीडियाच्या (सर्व माध्यमांच्या) माध्यमातून व्यापकपणे पोहोचवली जात आहे, ज्यामुळे ग्राहकांचा जागरूकतेपासून ते प्रत्यक्ष अनुभवापर्यंतचा प्रवास अधिक सुल
भ होईल.


