Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये क्रीडा कोट्यातून मोफत प्रवेश प्रक्रिया* राज्य, राष्ट्रीय...

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये क्रीडा कोट्यातून मोफत प्रवेश प्रक्रिया* राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्तीची संधी

 

 

पुणे : नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी क्रीडा कोट्यातून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केजी पासून पीएचडी पर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांसाठी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेल्या गुणवंत खेळाडूंना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

 

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे मोफत प्रवेश, १०० टक्क्यांपर्यंत क्रीडा शिष्यवृत्ती, मोफत आहार सुविधा, क्रीडा साहित्य तसेच महाविद्यालयाच्या अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांचा लाभ देखील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

 

संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, नर्‍हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही प्राधान्य दिले असून, क्रीडा क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments