Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजीव खंडेलवाल ठरले वंदे भारतमचे ब्रँड अँबेसेडर आणि संवादक

राजीव खंडेलवाल ठरले वंदे भारतमचे ब्रँड अँबेसेडर आणि संवादक

श्री. गौतम अदानी यांच्या वंदे भारतम या देशव्यापी उद्योजकता उपक्रमाचे सदिच्छादूत आणि निवेदक म्हणून प्रख्यात अभिनेते आणि दूरदर्शन निवेदक श्री. राजीव खंडेलवाल यांची घोषणा करण्यात आली आहे.

संपूर्ण भारतात या उपक्रमाच्या प्रसाराचे नेतृत्व करण्यासोबतच सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तळागाळातील नवोन्मेषक तसेच उद्योजकांना प्रसिद्धी मिळवून देण्यास खंडेलवाल मदत करतील.

दूरचित्रवाणी, चित्रपट आणि डिजिटल माध्यमांमध्ये कारकीर्द असलेल्या खंडेलवाल यांच्याकडे स्वतःचा असा चाहतावर्ग आहे तसेच निवेदनाचा दांडगा अनुभव आहे, ज्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या आसपास होणाऱ्या या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा अधिक प्रभावी होईल.

 

अहमदाबाद, 29 जून 2026: प्रसिद्ध अभिनेते, दूरचित्रवाणी निवेदक आणि उद्योजक श्री. राजीव खंडेलवाल हे श्री. गौतम अदानी यांनी सुरू केलेल्या ‘वंदे भारतम’ या देशव्यापी उपक्रमाचे ब्रँड अँबेसेडर आणि संवादक असतील, अधिक घोषणा आज करण्यात आली. भारतातील तळागाळातील नवोन्मेषक आणि उद्योजकांना शोधण्यासाठी अदानी समूहाचे अध्यक्ष श्री. गौतम अदानी यांनी हा देशव्यापी उपक्रम सुरू केला आहे.

 

 

निवेदक म्हणून, खंडेलवाल ‘वंदे भारतम’च्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचे सूत्रसंचालन करतील, ज्यामध्ये अंतिम स्पर्धक, मार्गदर्शक आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांसोबतच्या संवादाचा समावेश असेल. स्वातंत्र्यदिनाच्या आसपास अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाअंतिम सोहळ्याने या उपक्रमाची सांगता होईल. तर ब्रँड अँबेसेडर म्हणून, ते देशभरात या उपक्रमाच्या ध्येयाचा प्रचार करतील आणि भारतातील पारंपरिक स्टार्टअप केंद्रांच्या पलीकडील उद्योजक प्रतिभेला अधिक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी मदत करतील.

 

 

दूरचित्रवाणी, चित्रपट आणि डिजिटल माध्यमांमधील त्यांच्या कामासाठी, तसेच आपल्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय ‘रिअ‍ॅलिटी’ आणि ‘टॉक शो’चे सूत्रसंचालन केल्याबद्दल खंडेलवाल हे सर्वपरिचित आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातून—मग ती लहान शहरे असोत, ग्रामीण भाग असोत किंवा सुविधांपासून वंचित राहिलेले प्रदेश असोत…विविध भौगोलिक क्षेत्रांमधील प्रेक्षकांशी सहजपणे संवाद साधत उद्योजकीय गुणवत्तेचा शोध घेण्याची त्यांची हातोटी त्यांना अशा कार्यक्रमासाठी अत्यंत योग्य ठरवते.

 

 

या उपक्रमाचा शुभारंभ करताना श्री. गौतम अदानी म्हणाले: “जेव्हा मी माझा प्रवास सुरू केला, तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते. आज मी जे काही आहे आणि जे काही यश मी मिळवले आहे, ते सर्व मला या भारताच्या भूमीने दिले आहे. आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही, परंतु संधी मात्र देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत.

 

 

जगातील सर्वात मोठ्या स्टार्ट-अप परिसंस्थांपैकी एक भारताची आहे, तरीही या स्टार्ट-अप्सवर काही मोजक्याच शहरांचे वर्चस्व दिसते. ‘वंदे भारतम्’ हा अशा नवोन्मेषकांना, समस्यांवर तोडगा काढणाऱ्यांना आणि उद्योजकांना शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्यांच्या कल्पनांना ओळख, पाठिंबा आणि एका मोठ्या मंचाची गरज आहे. ज्यांच्याकडे काहीतरी नवीन उभारण्याचे धाडस आणि दृढ निश्चय आहे, अशा प्रत्येक भारतीयाला यात सहभागी होण्याचे आम्ही आवाहन करतो.”

 

 

या उपक्रमाशी जोडले गेल्याबद्दल आपल्या भावना मांडताना श्री. राजीव खंडेलवाल म्हणाले: “माझ्या कारकिर्दीत मी अशा अनेक लोकांना भेटलो आहे ज्यांच्याकडे विलक्षण कथा आहेत; परंतु ‘वंदे भारतम्’ हा उपक्रम काहीसा वेगळा आहे — यात अशा कथांचा शोध घेणे अपेक्षित आहे ज्या जगाला अद्याप माहीत नाहीत. एखाद्या लहान शहरातील किंवा गावातील नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तीला जगासमोर आणण्यासाठी आवाज बनणे, ही एक अशी जबाबदारी आहे ज्याबद्दल मी मनापासून उत्सुक आहे. या परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्तींना भेटण्यास आणि देशाला त्यांची माहिती देण्यासाठी मी उत्सुक आहे.”

 

 

देशातील सर्व 36 राज्ये, केंद्रशासित प्रदेश तसेच 800 हून अधिक जिल्ह्यांपर्यंत ‘वंदे भारतम’ हा कार्यक्रम पोहोचणार आहे. राज्य आणि प्रादेशिक स्तरावरील मूल्यमापनानंतर, अंतिम 75 स्पर्धकांना अहमदाबाद येथे एका विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या कार्यक्रमात मार्गदर्शन, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद तसेच गुंतवणूकदार आणि व्यावसायिक नेत्यांशी भेटीगाठी यांचा समावेश असेल. हे स्पर्धक विविध प्रदेश, क्षेत्रे आणि समाजातील प्रतिभेचे प्रतिनिधित्व करतील.

 

 

24 जून पासून vandebharatam.org येथे अर्ज उपलब्ध झाले आहेत.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments