Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात तात्पुरते बदल*

मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात तात्पुरते बदल*

 

 

पुणे दि. ६ (जिमाका, वृत्तसेवा): दि. ५ जुलै २०२६ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथील दैनंदिन कामकाजात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

 

आज (दि. ६ जुलै) IDTR येथील वाहनचालक चाचणी तसेच शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) चाचणीसाठी उपस्थित राहू न शकलेल्या अर्जदारांनी आपली अपॉइंटमेंट स्वतःच्या सोयीनुसार पुन्हा निश्चित (रिशेड्यूल) करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

चारचाकी वाहनांच्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी डिमांड ड्राफ्ट (DD) जमा करण्याची मुदत दि. ७ जुलै २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत वाढविण्यात आली असून, एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित क्रमांकाचा लिलाव दि. ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे.

 

योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate) नूतनीकरणासाठी दि. ६ जुलै रोजी आलेल्या वाहनांची कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या दैनंदिन क्षमतेनुसार पुढील सात दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून, उर्वरित वाहनधारकांनी आपली वाहने दि. ११ जुलै २०२६ रोजी सादर करावीत.

 

तसेच मंचर शिबिरासाठी दि. ६ जुलैची अपॉइंटमेंट कार्यालयामार्फत दि. १० जुलै २०२६ रोजी पुनर्नियोजित करण्यात आली आहे. मुसळधार पावसाची परिस्थिती कायम राहिल्यास पुढील बदलांविषयी स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना माहिती देण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments