Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedअतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांना सुरक्षा उपाययोजनांचे निर्देश*

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांना सुरक्षा उपाययोजनांचे निर्देश*

 

 

पुणे दि. 9 (जिमाका, वृत्तसेवा): अतिवृष्टीमुळे बांधकामस्थळी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार आणि नियोक्त्यांनी स्वतःची नियोक्ता म्हणून ims.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी, तसेच कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने व उपकरणे उपलब्ध करून सुरक्षित कामकाजाची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

जमीन खचणे, संरक्षक भिंती कोसळणे आदी संभाव्य घटनांच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या निवासस्थानी कोणताही धोका नसल्याची खातरजमा करून आवश्यक असल्यास सुरक्षित निवासाची व्यवस्था करावी. तसेच कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

 

यासोबतच, बांधकामस्थळी कार्यरत असलेल्या अनोंदणीकृत कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तातडीने नोंदणी करून शैक्षणिक, सामाजिक, सुरक्षा संच, अत्यावश्यक संच, वैद्यकीय तपासणी आदी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

बांधकाम कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेसंदर्भातील शासन निर्णय (दि. १३ डिसेंबर २०११) ची काटेकोर अंमलबजावणी करावी. सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष करून अपघात किंवा मनुष्यहानी झाल्यास संबंधित बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार किंवा नियोक्ता यांनाच पूर्णपणे जबाबदार धरले जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments