Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorized*मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी*

*मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी*

 

 

पुणे, दि. ९ (जिमाका, वृत्तसेवा): मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी अॅथलेटिक्स, हॉकी आणि रोईंग या खेळांच्या खेळाडू निवड चाचण्यांचे आयोजन दि. १४ व १५ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे.

 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे सकाळी १० वाजता अॅथलेटिक्स व हॉकीच्या निवड चाचण्या होणार आहेत. रोईंगची निवड चाचणी दि. १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी काळभोर येथे होईल.

 

२५ वर्षांखालील महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पदकविजेते किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू पात्र असून, निवड चाचणीसाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, मूळ कागदपत्रे, सत्यप्रती आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

 

अधिक माहितीसाठी सुरेश काकड (८८८८८०६१५८), ज्योती सूर्यवंशी (९०७५०४०३२०), मनीषा माळी (७३९१९६८१९२) किंवा मनीषा दिवेकर (९७६४३८५१५२) यांच्याशी संपर्क साधावा.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments