Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर*

 

 

मुंबई, दि. ९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी वाहिनी संयुक्तपणे निर्मित ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रीमियर शो झाला.

 

या ‘प्रीमियर शो’साठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव समृद्धी अनगोळकर, संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, गोविंद अहंकारी, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले, उपसंचालक वर्षा आंधळे, आदी उपस्थित होते.

 

हा माहितीपट पंढरपूर वारीची प्रत्यक्ष अनुभूती देतो. या चित्रपटागृहामध्ये जणू काही पंढरपूरची वारी प्रत्यक्षात उतरली असल्याचेही अनुभव येत असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

 

*थोडक्यात माहितीपट*

‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ हा २२ मिनिटांचा माहितीपट वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. या माहितीपटाचे मराठी, इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगु, बंगाली, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये डबिंग करुन त्याचे डिस्कव्हरीच्या विविध उपग्रह वाहिन्यांवरुन प्रसारण करण्यात येत आहे. विविध भाषांमधील या माहितीपटाचे प्रसारण डिस्कव्हरी, डिस्कव्हरी एचडी, टीएलसी, टीएलसी एचडी, अ‍ॅनिमल प्लॅनेट, अ‍ॅनिमल प्लॅनेट एचडी, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी (आयडी), डिस्कव्हरी सायन्स, डिस्कव्हरी टर्बो अशा ९ वाहिन्यांवरुन करण्यात येत आहे.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments