Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यधाम आश्रमाने ‘स्वच्छ–सुंदर–आरोग्यदायी-आरोग्यदायी शाळा’ उपक्रमाचे आयोजन केले आणि ३ शाळांना पुरस्कार प्रदान...

पुण्यधाम आश्रमाने ‘स्वच्छ–सुंदर–आरोग्यदायी-आरोग्यदायी शाळा’ उपक्रमाचे आयोजन केले आणि ३ शाळांना पुरस्कार प्रदान केले

Pune 10th July 2026:

गेल्या पंधरवड्यात पुण्यधाम आश्रमाच्या वतीने कोंढवा, कात्रज व उंड्री परिसरातील २० शाळांमध्ये गेल्या वर्षभर “स्वच्छ–सुंदर–आरोग्यदायी शाळा” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्यामार्फत ही जाणीव त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचविणे हा होता.

 

या स्पर्धेचे परीक्षण पुण्यधाम आश्रमाच्या प्रतिनिधींनी शाळांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भेटी देऊन केले. शाळांमधील स्वच्छता, आरोग्यविषयक उपक्रम, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि परिसराची निगा या निकषांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले.

 

या परीक्षणाच्या आधारे हुजूरपागा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल, मांगडेवाडी, कात्रज, पुणे या शाळेला प्रथम क्रमांक, दादा गुजर माध्यमिक विद्यालय, मोहम्मदवाडी, पुणे या शाळेला द्वितीय क्रमांक आणि रसिकलाल धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल, कोंढवा, पुणे या शाळेला तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला.

 

प्रथम क्रमांक प्राप्त शाळेला पुण्यधाम ट्रस्टच्या प्रमुख माता कृष्णा कश्यप तसेच माजी जिल्हाधिकारी श्रीमती लीना मेहंदळे यांच्या हस्ते फिरता चषक (rolling trophy) प्रदान करण्यात आला.

 

हा उपक्रम भविष्यातही सातत्याने सुरू राहावा आणि सर्व शाळांनी स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावीपणे राबवावी, या उद्देशाने सहभागी प्रत्येक शाळेला स्वच्छता गीत, स्वच्छता प्रतिज्ञा, स्वच्छता प्रमाणपत्र तसेच ₹२,००० किमतीचे स्वच्छता किट भेट म्हणून देण्यात आले.

 

पुढील वर्षीही या उपक्रमांतर्गत सर्व सहभागी शाळांचे कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक परीक्षण करण्यात येणार असून, त्या परीक्षणाच्या आधारे उत्कृष्ट शाळांची निवड करून त्यांना गौरविण्यात ये

णार आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments