Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेशव माधव विश्वस्त निधी तर्फे  दौंड शहरातील व ग्रामीण भागातील ...

केशव माधव विश्वस्त निधी तर्फे  दौंड शहरातील व ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये देशी वृक्षप्रजातींची लागवड.

 

ब्लॉसम इंग्रजी माध्यम विद्यालय,श्रीगुप्तेश्वर माध्यमिक आश्रमशाळा,गीताबाई तात्याराव पवार आश्रमशाळा,रासाई देवी आश्रमशाळा वरवंड,नवयुग शिक्षण संस्थेचे स्व.लाजवंती भावनदास गॅरेला विद्यालयातील मुला-मुलींनी नोंदविला उस्फुर्त सहभाग.

 

पुणे/दौंड

(प्रतिनिधी)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी व कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेतर्फे दौंड येथील विविध विद्यालयांमध्ये पंचपरिवर्तन अंतर्गत पर्यावरण गतिविधि तर्फे *”वृक्षारोपण कार्यक्रम”* घेण्यात आला.

दौंड शहरातील व जवळपास असणाऱ्या ग्रामीण भागातील ब्लॉसम इंग्रजी माध्यम विद्यालय,श्रीगुप्तेश्वर माध्यमिक आश्रमशाळा,गीताबाई तात्याराव पवार आश्रमशाळा सोनवडी,दीनदयाळ शिक्षण संस्थेचे रासाईदेवी प्राथमिक आश्रमशाळा वरवंड,नवयुग शिक्षण संस्थेचे स्व.लाजवंती भावनदास गॅरेला विद्यालय या एकूण पाच शाळांमधील प्रांगणात

जांभूळ,अर्जुन, प्राजक्त,कडुलिंब,पिंपळ,ह्या देशी प्रजातीच्या पन्नास रोपांची लागवड करण्यात आली.हवामान बदल,वाढते तापमान,अनियमित पाऊस,भूजल पातळीतील घसरण आणि जैवविविधतेवरील परिणाम यांचा अभ्यास करून दौंड येथील ही झाडे लावण्याच्या केशव माधव विश्वस्त निधी ह्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने ठरवले त्याप्रमाणे

ह्या पाचही शाळेत झाडे लावण्यात आली त्यात विद्यार्थी,विद्यार्थिनी,शिक्षकांनी ह्या उपक्रमामध्ये उस्फुर्त सहभाग नोंदविला.खड्डे करणे,रोपे लावणे, रोपांना पाणी देणे इ.कामामध्ये त्यांनी उत्साह दाखविला.

जेष्ठ कार्यकर्ते दत्ताजी शेणोलीकर (वय वर्षे ९२) तसेच विविध शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी यांचे याकामी मार्गदर्शन लाभले.

यावेळी केशव माधव विश्वस्त निधी चे विश्वस्त प्रशांत कुलकर्णी,प्रकाश देशपांडे,संजय वळसंगकर,दौंड येथील उत्तम बापू पवार,मुख्याध्यापक मकरंद पवार,शैलजा सरनोत,गुरुमुख नारंग,राजू लोखंडे,दिलीप कुदांडे, मालन दिवेकर,राजू शिर्के,बाळासाहेब वागसकर ह्यांची मुख्य उपस्थिती होती.

केशव माधव विश्वस्त निधी चे पदाधिकारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेचे उल्हास सावळेकर,प्रमोद कुलकर्णी,नंदकुमार कुलकर्णी,प्रकाश देशपांडे,नरेंद्र प्रधान,योगशिक्षक सुभाष फडके,मोहन मोने,श्रीकांत पुराणिक,संजय वळसंगकर,नाना भालशंकर,चंद्रशेखर गोरे,प्रशांत कुलकर्णी यांनी पाचही शाळांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व,झाडे लावण्याची आवश्यकता केशव माधव तर्फे प्रतिपादन करण्यात आली

……………………….

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments