Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorized९२ वर्षीय जेष्ठ स्वयंसेवक दत्ताजी शेणोलीकर सर्वांचे शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील कार्याचे प्रेरणास्थान* ...

९२ वर्षीय जेष्ठ स्वयंसेवक दत्ताजी शेणोलीकर सर्वांचे शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील कार्याचे प्रेरणास्थान*  ——दौंड मधील ऋषितुल्य व्यक्तिमत्व.

 

पुणे/दौड

 

दत्ताजी शेणोलीकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते असून सध्या त्यांचे वय ९२ वर्षे आहे तरीही सामाजिक कार्य करण्याची त्यांची जिद्द तरुणांना लाजवेल अशी आहे.त्यांच्याच अथक प्रयत्नाने दौंड मधील सर्व विद्यालयात झाडे लावण्याचा उपक्रम यशस्वी होऊ शकला.शारीरिक मर्यादा असूनही सर्व शिक्षण संस्थांच्या प्रमुखांशी, मुख्याध्यापकांशी बोलणी करून,बैठका घेऊन या वृक्षावरोपण प्रकल्पाची माहिती दिली.त्यांचेकडून पूर्वतयारी करून घेतली.सर्व ठिकाणी स्वतः हजर राहून हा कार्यक्रम यशस्वी केला तसेच या रोपांच्या वाढीची,निगा राखण्याची जबाबदारी संस्थांची असल्याचे संस्थाचालकांना व मुख्याध्यापकांना सांगितले.

दत्ताजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षापासून कार्य करत आहेत.दौंड येथील बंगला साईड विभागामध्ये “प्रताप सायं शाखा” सुरू केली नवतरुणांना संघकार्यामध्ये व विविध सेवा कार्यामध्ये जोडण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.अनेक राष्ट्रपुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी निमित्त त्यांच्या राष्ट्रकार्याची माहिती देण्याचे कार्य अखंडपणे करत आहेत.

दत्ताजी यांनी रेल्वे मध्ये नोकरी केली.नोकरी चालू असतांना संघाचे अविरत काम केले निवृत्तीनंतरही आज पर्यंत अखंडपणे मार्गदर्शन करत आहेत.आसाममध्ये त्यांनी प्रचारक म्हणूनही काम केले.आणीबाणीच्या काळात तरुणांना योग्य मार्गदर्शन करत असत.त्यांनी दौंड येथे डॉ हेडगेवार समितीची स्थापना करून शाळेतील दहावी,बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे,गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम मदत करत असतात.आषाढी वारीच्या निमित्ताने दौंड मधील सर्व शालेय विद्यार्थ्यांची दिंडी काढून पालखीचा कार्यक्रम गेले २५ वर्ष अव्याहतपणे चालू ठेवला आहे.

पूर्वी ते आपल्या जावा मोटारसायकल वर भगवा ध्वज लावून तालुक्यातील सर्व गावांमध्ये राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करत असत.

वरवंड येथे त्यांच्या मातोश्रीच्या स्मरणार्थ भटक्या,विमुक्त जाती जमातींच्या गरजू मुलांना शिक्षण मिळावे यासाठी आश्रम शाळा काढली असून तानाजी दिवेकर व सौ मालन तानाजी दिवेकर हे सर्व व्यवस्था बघत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments