सिरियमच्या जून २०२६ च्या वेळेवर उड्डाण करणा-या विमान कंपन्यांच्या यादीक एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथे स्थान पटकावले.
गुरुग्राम, ९ जुलै: सिरीयम या विमान वाहतूक क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीने जून २०२६ मधील वेळेवर उड्डाण करणा-या विमान कंपन्यांची जागतिक क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत एअर इंडियाने चौथे स्थान पटकावले आहे. हा सन्मान एअर इंडियाच्या कार्यक्षम सेवा, वेळापत्रकाचे काटेकोर पालन आणि प्रवाशांना वक्तशीर सेवा देण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक मानले जात आहे. या कामगिरीमुळे जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात एअर इंडियाची विश्वासार्ह ओळख निर्माण झाली आहे.
सिरियमच्या जून २०२६ अहवालात वेळेवर उड्डाण करणा-या विमान कंपन्यांची माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार, गेल्या महिन्यात एअर इंडियाच्या एकूण १५ हजार विमानांच्या उड्डाणांची नोंद करण्यात आली होती. यात विमानांच्या वेळेवर उड्डाण कऱण्याचे प्रमाण ८६.२३ टक्क्यांपर्यत नोंदवले गेले. विमानांचा उड्डाण पूर्णत्वाचा दर ९९.७ टक्क्यापर्यंत दिसून आला. जवळपास सर्व नियोजित उड्डाणे विनाअडथळा नियोजनानुसार पार पडली.
हा सन्मान एअर इंडियाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ आहे. कंपनीने आपल्या कार्यक्षमतेत मोठी गुंतवणूक केली आहे. विमान फे-यांचे नियोजनही अचूकतेने आखले आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामाचा दर्जा सुधारण्यावर मोठा भर दिला आहे. या सर्व प्रयत्नांमुळेच एअर इंडियाला उत्कृष्ट कामगिरी करणे शक्य झाले आहे.
एअर इंडिया हब-एण्ड-स्पोक नेटवर्क पद्धतीनुसार विमानसेवा चालवते. या व्यवस्थेत दिल्ली आणि मुंबई या देशातील दोन प्रमुख विमानतळांमधून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे मोठ्या प्रमाणावर संचालन केले जाते. त्यामुळे या विमानतळांवरील कामकाजाचे व्यवस्थापक आव्हानात्मक असते. दिल्ली आणि मुंबई विमानतळांवर अनेकदा प्रवाशांची वर्दळ आणि हवाई वाहतूक नियंत्रणाशी संबंधित निर्बंध असतात. या निर्बंधाचे पालन करताना उड्डाणाच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. एका उड्डाणाच्या विलंबाचा परिणाम रांगेतील इतर उड्डाणांवरवही होण्याची शक्यता असते.
कालांतराने एअर इंडियाने आपल्या उड्डाणांच्या वेळेची अचूकता आणि सेवेची विश्वासार्हता वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. नियोजित वेळेनुसार उड्डाणे रवाना करण्यासाठी लागणारा वेळ कमी व्हावा याकरिता सक्षम कार्यपद्धतींचे अवलंबन केले जात आहे. संपूर्ण उड्डाण नेटवर्कवर अचूक आणि प्रभावी पद्धतीने देखरेख करण्यासाठी खास यंत्रणा उभारण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत तातडीने आणि योग्य निर्णय घेता यावेत, याकरिता आवश्यक कार्यपद्धतींचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. या उपाययोजनांमुळे प्रवाशांना वेळेवर, सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह प्रवासाचा अनुभव मिळतो.
कंपनीची विमानसेवा सक्षम आणि विश्वासार्ह असावी, याकरिता एअर इंडियाने महत्त्वाचे बदल केले आहेत. अनपेक्षित परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन नियोजनाची आखणी करण्यात आली आहे. कंपनीच्या विविध विभागांमधील समन्वय मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. हवामानातील बदल, विमान उड्डाण क्षेत्रातील निर्बंध, विमानतळावरील गर्दी किंवा तांत्रिक अडचणी यांसारख्या परिस्थितींना तातडीने प्रतिसाद देण्याकरिता सक्षम कार्यव्यवस्था विकसित करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे उड्डाणांवरील अडथळ्यांवर प्रभावीपणे मात करता येते. विमानसेवेचे नेटवर्क स्थिर राहण्यास मदत होते. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचवता येते.
एअर इंडियाच्य कार्यक्षमतेतील सुधारणा हे कंपनीच्या परिवर्तन मोहिमेचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे. कंपनीने आपल्या विमानांच्या ताफ्यांचे आधुनिकीकरण केले आहे. प्रवासादरम्यान ग्राहकांचा अनुभव चांगला राहावा, याकरिता विविध सोयीसुविधा दिल्या जात आहेत. कंपनीच्या कार्यपद्धतीत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तसेच, हब-अँण्ड-स्पोक नेटवर्कचा विस्तार करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संपर्क मजबूत केला जात आहे. या सर्व उपक्रमांमुळे एअर इंडिया आधुनिक, कार्यक्षम आणि जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक विमान कंपनी म्हणून स्वतःचे स्थान बळकट करत आहे.
विमानांचे आधुनिकीकरण
एअर इंडिया व्यापक स्वरुपात परिवर्तन उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत विमान ताफा नूतनीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठ्या विमान ताफा नूतनीकरण कार्यक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे. कंपनीने एअरबस, बोईंग कंपनीच्या ६०० नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. सेवेतील कार्यरत विमानांचेही आधुनिकीकरण केले जात आहे. या आधुनिकीकरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडेल. गेल्या सहा महिन्यांत एअर इंडियाच्या ताफ्यात तीन नवीन बोईंग ७८७-९ विमाने दाखल झाली आहेत. यंदाच्या वर्षात बोईंग ७८७-९ आणि एअरबस ए३५०-१००० विमानांचा ताफा सामील होईल.
याचबरोबर, एअर इंडिया आपल्या जुन्या वाइडबॉडी विमानांच्या आधुनिकीकरणाचे कामही वेगाने पूर्ण करत आहे. कंपनीच्या ताफ्यातील जुन्या २६ बोईंग ७८७-८ विमानांपैकी दोन विमानांचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, ही विमाने पुन्हा सेवेत दाखल झाली आहेत. या विमानांच्या आतील रचना आणि प्रवासी सुविधा पूर्णपणे नव्याने विकसित करण्यात आल्या आहेत. तसेच, आणखी तीन बोईंग ७८७-८ विमानांच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु आहे. अमेरिकेत या तिन्ही विमानांच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरु आहे.
वर्षाअखेरीपर्यंत वाइडबॉडी विमान ताफ्यातील ५० टक्क्यांहून अधिक विमानांमध्ये नवीन किंवा अद्यायावर सुविधा उपलब्ध असतील. या आधुनिकीकरणामुळे विमानांची अंतर्गत रचना आधुनिक तसेच आरामदायी असेल. विविध सोयीसुविधांमुळे प्रवाशांना लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये दर्जेदार प्रवाशाचा अनुभव मिळेल.
जगभरात वेळेवर उड्डाण करणा-या विमान कंपन्यांच्या यादीत एअर इंडियाची पहिल्या पाच क्रमांकात बाजी
RELATED ARTICLES


