Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedकिया इंडियाकडून इलेक्ट्रिक एसयूव्ही सिरॉस ईव्ही लाँच, २५,००० रुपयांमध्ये प्री-बुकिंग आजपासून...

किया इंडियाकडून इलेक्ट्रिक एसयूव्ही सिरॉस ईव्ही लाँच, २५,००० रुपयांमध्ये प्री-बुकिंग आजपासून सुरू

५१.४ केडब्ल्यूएच एक्सटेंडेड रेंज बॅटरीसह सेगमेंटमधील सर्वोत्तम ५२६ किमीची एआरएआय-प्रमाणित रेंज (एमआयडीसी फुल) – ५०० किमीचा टप्पा ओलांडणारी या सेगमेंटमधील पहिली वेईकल; ४२ केडब्ल्यूएच बॅटरीसह ४४३ किमीची एआरएआय-प्रमाणित रेंज (एमआयडीसी फुल).
सेगमेंटमधील सर्वोत्तम १७१ पीएस पॉवर आउटपुट, तसेच फक्त ३९ मिनिटांत १० टक्के ते ८० टक्के सेगमेंटमधील सर्वोत्तम डीसी फास्ट चार्जिंग (१०० किलोवॅट चार्जर).
लाइफटाइम* हाय व्होल्टेज बॅटरी वॉरंटी, आकर्षक अॅश्युअर्ड बायबॅक उपक्रम आणि बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (बीएएएस) दीर्घकालीन मालकीचा आत्मविश्वास देतात.
के-चार्ज भारतातील प्रमुख २३ चार्ज पॉईंट ऑपरेटर्समधील २०,३०० पेक्षा जास्त चार्जिंग पॉईंट्स एकत्रित करते, ज्यामध्ये दैनंदिन सुलभ चार्जिंगसाठी मायकिया अॅपवर एकच वॉलेट उपलब्ध आहे.
सेगमेंटमधील पहिले ७६.२० सेमी (३० इंच) वाईड ट्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनेल; आणि हार्मन कार्डन प्रीमियम ८-स्पीकर साउंड सिस्टम व ओव्हर-द-एअर (OTA) सॉफ्टवेअर अपडेट्स.
सेगमेंटमधील सर्वोत्तम १६ ऑटोनॉमस वैशिष्ट्यांसह एडीएएस लेव्हल २ आणि २५ मानक हाय-सेफ्टी वैशिष्ट्ये.
किया इंडियाची वेबसाईट आणि देशभरातील डीलरशिपच्या माध्यमातून आजपासून २५,००० रुपयांमध्ये प्री-बुकिंग सुरू होत आहे.
पुणे, १५ जुलै २०२६ : किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम वाहन उत्पादक कंपनीने आज आपली दुसरी मास-मार्केट इलेक्ट्रिक वेईकल सिरॉस ईव्ही लाँच केली. किया इंडियाची वेबसाईट (kia.com) व देशभरातील डीलरशिपच्या माध्यमातून २५,००० रुपयांमध्ये या वेईकलचे प्री-बुकिंग सुरू केले. सिरॉस ईव्ही सेगमेंटमधील सर्वोत्तम ५२६ किमीच्या एआरएआय-प्रमाणित रेंजसह मालकीहक्क पॅकेजची जोड देते, जे ईव्ही स्वीकारण्यातील सर्वात सामान्य अडथळे दूर करण्यासाठी तयार केले गेले आहे, ज्यामध्ये लाइफटाइम* हाय व्होल्टेज बॅटरी वॉरंटी, अॅश्युअर्ड बायबॅक उपक्रम आणि स्थिर बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (बीएएएस) फायनान्सिंगचा समावेश आहे.
भारतातील ईव्ही खरेदीदार आता केवळ रेंजच्या अपेक्षेच्या पलीकडे गेले आहेत. बाजारपेठ परिपक्व होत आहे, तसतसे ग्राहक इलेक्ट्रिक वेईकलकडून कोणत्याही तडजोडीशिवाय आपल्या जीवनात सामावून घेण्याची अपेक्षा करत आहेत, ज्यामध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान, कनेक्टेड अनुभव, विश्वासार्ह चार्जिंग आणि दीर्घकालीन मूल्याचा आत्मविश्वास समाविष्ट आहे. सिरॉस ईव्ही नेमका हाच आत्मविश्वास देण्यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जी ईव्ही-केंद्रित तंत्रज्ञान, सेगमेंटमधील आघाडीची वैशिष्ट्ये आणि तडजोड न करणाऱ्या सुरक्षिततेसह एसयूव्हीची आकर्षक डिझाइन आणि वैविध्‍यतता एकत्र आणते.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत किया इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ श्री. ग्वांगु ली म्हणाले, “आमचे ‘मूव्हमेंट दॅट इन्स्पायर्स’ तत्त्वज्ञान आमच्या ग्राहकांसाठी भविष्यातील गतिशीलता अर्थपूर्ण, सुलभ आणि समृद्ध बनवण्याबद्दल आहे. भारतातील आमच्या दुसऱ्या मास-मार्केट इलेक्ट्रिक वेईकलसह म्हणजेच सिरॉस ईव्हीसह आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारेच नाही, तर ग्राहकांना इलेक्ट्रिक वेईकल खरेदी करताना येणाऱ्या चिंता दूर करून प्रगत इलेक्ट्रिक गतिशीलतेचे लोकशाहीकरण करत आहोत, सिरॉस ईव्ही सेगमेंटमधील सर्वोत्तम ५२६ किमीची एआरएआय-प्रमाणित रेंज देते. ५०० किमीचा टप्पा ओलांडणारी ही या सेगमेंटमधील पहिली वेईकल आहे. सेगमेंटमधील सर्वोत्तम १७१ पीएस पॉवर आउटपुटसह ही वेईकल ग्राहकांना कामगिरीशी तडजोड न करता पुढे जाण्याचा आत्मविश्वास देते. लाइफटाइम* बॅटरी वॉरंटी, अॅश्युअर्ड बायबॅक आणि बीएएएस यांसह सोपा आणि सुलभ मालकीच्या अनुभवाच्या पाठबळावर आम्ही भारतातील कुटुंबांसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि त्यांना इलेक्ट्रिक वेईकल्सचा अवलंब करण्‍यास प्रेरित करत आहोत.”
मालकीचा आत्मविश्वास आणि मन:शांती
प्रत्येक सिरॉस ईव्हीला लाइफटाइम* हाय व्होल्टेज बॅटरी वॉरंटीचे पाठबळ दिले गेले आहे, जे ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण मालकीच्या प्रवासात अधिक मन:शांती प्रदान करताना आपल्या बॅटरी तंत्रज्ञानाच्या दीर्घकालीन टिकाऊपणा आणि विश्वासार्हतेबद्दल कियाचा आत्मविश्वास पुन्हा दर्शवते. याला पूरक म्हणून आकर्षक अॅश्युअर्ड बायबॅक उपक्रम आहे, जो वेईकलचे अवशिष्ट मूल्य (रेसिड्युअल व्हॅल्यू) सुरक्षित ठेवतो आणि पुनर्विक्रीच्या वेळी आत्मविश्वास देतो, तसेच कियाचा बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (बीएएएस) उपक्रम स्थिर आर्थिक पर्यायांद्वारे सुरुवातीचा खरेदी खर्च सुलभ करतो. एकत्रितपणे, हे ग्राहक-केंद्रित उपक्रम ईव्ही स्वीकारण्यातील तीन मुख्य अडथळे दूर करतात, ज्यात बॅटरीचे आयुष्य, पुनर्विक्रीचे मूल्य आणि सुरुवातीचा खरेदी खर्च यांबद्दलच्या चिंतांचा समावेश आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक गतिशीलता अधिक सुलभ, अंदाज लावण्याजोगी आणि चिंतामुक्त बनते.
(ुलभ इलेक्ट्रिक अनुभवासाठी डिझाइन करण्‍यात आलेली ईव्ही
आपल्या उत्कृष्ट रेंजच्या दाव्याला प्रबळ करत सिरॉस ईव्ही दोन बॅटरी पर्यायांसह लाँच करण्‍यात आली आहे — ५१.४ केडब्ल्यूएच बॅटरी, जी ५२६ किमीची (एमआयडीसी फुल) एआरएआय-प्रमाणित सेगमेंटमधील सर्वोत्तम रेंज देते, ज्यामुळे ५०० किमी रेंजचा टप्पा ओलांडणारी या सेगमेंटमधील पहिली वेईकल ठरली आहे, आणि ४२ केडब्ल्यूएच बॅटरी, जी ४४३ किमीची (एमआयडीसी फुल) रेंज देते. याला पूरक म्हणून सेगमेंटमधील सर्वोत्तम डीसी फास्ट चार्जिंग सुविधा आहे, जी १०० किलोवॅट चार्जरसह फक्त ३९ मिनिटांत बॅटरी १० टक्के ते ८० टक्के चार्ज करते, आणि बॅटरी कंडिशनिंग वैशिष्ट्य, जे जलद डीसी चार्जिंगसाठी बॅटरीचे तापमान अनुकूल करते, ज्यामुळे दैनंदिन चार्जिंग सुलभ होते. सिरॉस ईव्हीमध्ये के-चार्ज परिसंस्थेचा इंटिग्रेटेड रूट प्लॅनर आणि स्थिर चार्जिंग नियंत्रणांच्या पाठबळासह १०.८ किलोवॅट ऑनबोर्ड एसी चार्जिंग क्षमता देखील आहे.
कियाच्या प्रबळ के१ प्लॅटफॉर्मवर डिझाइन केलेली सिरॉस ईव्ही प्रगत निकेल मॅंगनीज कोबाल्ट (एनएमसी) बॅटरीमधून सेगमेंटमधील सर्वोत्तम १७१ पीएस पॉवर आउटपुट देते, जी ५१.४ केडब्ल्यूएच पॅकसह फक्त ८.१ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग पकडते. लिक्विड-कोल्ड थर्मल मॅनेजमेंट सिस्टम असलेली आयपी६७-प्रमाणित बॅटरी भारतातील विविध हवामान परिस्थितीचा सामना करण्यासाठी डिझाइन केली आहे.
ईव्ही-विशिष्ट तंत्रज्ञानामध्ये ऑटो मोड आणि आय-पॅडलसह रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसाठी पॅडल शिफ्टर्स, वेईकल-टू-लोड (इंटर्नल), बॅटरी हीटिंग सिस्टम, डिजिटल की, व्हर्च्युअल इंजिन साउंड सिस्टम (व्हीईएसएस) आणि शिफ्ट-बाय-वायर – कॉलम टाईप यांचा समावेश आहे.
भारतासाठी डिझाइन केलेली चार्जिंग परिसंस्था
सिरॉस ईव्हीच्या मालकीहक्क प्रस्तावाचा मुख्य गाभा म्हणजे के-चार्ज आहे, जी मायकिया अॅपवर उपलब्ध असलेली किया इंडियाची ईव्ही चार्जिंग परिसंस्था आहे. के-चार्ज देशातील आघाडीच्या २३ चार्ज पॉईंट ऑपरेटर्समधील २०,३०० पेक्षा जास्त चार्जिंग पॉईंट्स एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र आणते, ज्यामुळे चालकांना एकाच वॉलेटद्वारे चार्जिंग शोधणे, तेथपर्यंतचा मार्ग निश्चित करणे आणि पैसे भरणे सोपे होते, यामुळे रेंजची चिंता दूर होते आणि सार्वजनिक चार्जिंग सुलभ होते. उच्च क्षमतेच्या डीसी फास्ट चार्जर्सनी सज्ज असलेले १२९ पेक्षा जास्त किया डीलरशिप्‍स आणि २७५ पेक्षा जास्त ईव्ही-सज्ज वर्कशॉप्सद्वारे ही परिसंस्था प्रत्‍यक्ष अधिक दृढ करण्‍यात आली आहे, ज्यामुळे ग्राहक कुठेही प्रवास करत असले तरी त्यांना विश्वासार्ह चार्जिंग आणि सेवा सहाय्य मिळते.
भविष्याभिमुख डिझाइन: आकर्षक आणि प्रगतीशील
कियाच्या जागतिक ईव्ही डिझाइन तत्त्वज्ञानापासून प्रेरित होऊन सिरॉस ईव्ही विशिष्ट ईव्ही-संबंधित शैलीसह सिरॉसच्या आकर्षक आणि सरळ रचनेवर आधारित आहे: कियाचा सिग्नेचर डिजिटल टायगर फेस, आइस क्यूब एमएफआर एलईडी हेडलाइट्स, मानक फ्रंट एलईडी फॉग लॅम्प्स, एकात्मिक टर्न इंडिकेटर्ससह स्टार मॅप एलईडी डे-टाइम रनिंग लॅम्प्स. मागील बाजूस असलेले स्टार मॅप एलईडी टेल लॅम्प्स वेईकलचे आधुनिक लुक अधिक दृढ करतात. ही वेईकल सेगमेंटमधील पहिल्या ऑटो स्ट्रीमलाइन डोअर हँडल्स आणि आर१७ – ४३.६६ सेमी (१७-इंच) क्रिस्टल कट ड्युअल-टोन एरो अलॉय व्हील्ससह (१६-इंच व्हील पर्यायासह) येते. एरो इन्सर्टसह ब्लॅक हाय ग्लॉसी फ्रंट आणि रिअर स्किड प्लेट्स, ब्लॅक हाय ग्लॉसी गार्निश टाईप रूफ रेल्स आणि आकर्षक साईड गार्निश पर्याय प्रगतीशील एसयूव्हीचे वैशिष्ट्य पूर्ण करतात.
आरामदायीपणा, तंत्रज्ञान आणि दैनंदिन व्यावहारिकता
या वेईकलमधील केबिनच्या केंद्रस्थानी सेगमेंटमधील पहिले ७६.२० सेमी (३० इंच) रुंद ट्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनेल आहे, ज्यामध्ये ३१.२४ सेमी (१२.३ इंच) एचडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ३१.२४ सेमी (१२.३ इंच) एचडी टचस्क्रीन नेव्हिगेशन कॉकपिट आणि १२.७ सेमी (५ इंच) क्लायमेट कंट्रोल इंटरफेस समाविष्ट आहे, ज्याला ९५ हून अधिक वैशिष्ट्यांसह किया कनेक्ट २.०, ओव्हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपडेट्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, हार्मन कार्डन प्रीमियम ८-स्पीकर साउंड सिस्टम आणि स्मार्टफोन वायरलेस चार्जरचे पाठबळ आहे.
यातील आरामदायीपणा आणि व्यावहारिकता पुढीलप्रमाणे आहे: केबिनमध्ये प्रशस्त, वैविध्‍यपूर्ण मांडणीसह एैसपैस रिअर लेगरूम मिळते, ज्याला ६०:४० स्प्लिट रियर सीट्सची जोड दिली आहे, जे स्लाईड आणि रिक्लाईन होऊ शकतात, ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासानुसार आरामदायीपणा निश्चित करता येतो. समोरच्या बाजूला (सीट आणि बॅक) आणि मागील बाजूला व्हेंटिलेटेड सीट्स (केवळ सीट), ४-वे पॉवर ड्रायव्हर सीट, ड्युअल पेन पॅनोरॅमिक सनरूफ, एलईडी फुटवेल लॅम्प्ससह पहिल्या रांगेत ६४-कलर अॅम्बियंट मूड लाइटिंग, ड्युअल कॅमेऱ्यासह स्मार्ट डॅशकॅम, मागील दरवाजाचे सनशेड पडदे आणि नवीन १०० वॅट फ्रंट यूएसबी-सी चार्जरसह विविध यूएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्ट आणि समर्पित कव्हरसह १६-लिटर फ्रंक केबिनचा हा अनुभव परिपूर्ण करतात.
विश्वास निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेली प्रगत सुरक्षा
सिरॉस ईव्हीमध्ये लेव्हल २ एडीएएस देण्यात आले आहे, ज्यामध्ये सेगमेंटमधील सर्वोत्तम १६ ऑटोनामस फंक्शन्स समाविष्ट आहेत, यात फ्रंट कोलिजन-अव्हॉइडन्स असिस्ट – कार, पादचारी, सायकलस्वार, जंक्शन-टर्निंग आणि थेट समोरून येणारी वाहने, स्टॉप अँड गो सह स्मार्ट क्रूझ कंट्रोल, लेन कीपिंग आणि लेन फॉलोइंग असिस्ट, आणि ड्रायव्हर अटेंशन वॉर्निंग, हाय बीम असिस्ट आणि लीडिंग वेईकल डिपार्चर अलर्ट यांचा समावेश आहे. ३६०-डिग्री कॅमेरा, क्लस्टरमध्ये असणारे ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर आणि पार्किंग कोलिजन-अव्हॉइडन्स असिस्ट – रिव्हर्स (पीसीए-आर) सोबत फ्रंट, रिअर आणि साईड पार्किंग सेन्सर्स अरुंद शहरी जागांमध्ये आत्मविश्वासाने पार्किंग करण्यास मदत करतात.
या सर्वांना कियाच्या २५ मानक हाय-सेफ्टी वैशिष्ट्यांचे पाठबळ आहे, ज्यामध्ये सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी), वेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (व्हीएसएम), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (एचएसी), ब्रेक असिस्ट सिस्टम (बीएएस), हायलाईन टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, आयएसओफिक्स (ISOFIX) चाईल्ड अँकरेज आणि रिअर ऑक्युपंट अलर्ट यांचा समावेश आहे. ऑल व्हील डिस्क ब्रेक्स आणि ऑटो होल्डसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक प्रत्येक प्रवासासाठी सर्वसमावेशक सुरक्षा आणि अधिक मन:शांती प्रदान करतात.
व्हेरिएंट्स आणि रंगांचे पर्याय
सिरॉस ईव्ही दोन बॅटरी पॅक पर्यायांसह सात ट्रिम्समध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या ड्रायव्हिंगच्या गरजांना सर्वात योग्य कॉन्फिग्‍युरेशन निवडण्याची स्थिरता मिळेल. ग्राहक नऊ एक्‍स्‍टीरिअर रंगांमधून निवड करू शकतात – ग्लेशियर व्हाईट पर्ल, फ्रॉस्ट ब्लू, ग्रॅव्हिटी ग्रे, प्युटर ऑलिव्ह, मॅग्मा रेड, आयव्हरी सिल्व्हर मॅट, आयव्हरी सिल्व्हर ग्लॉस, ऑरोरा ब्लॅक पर्ल आणि एक्स-लाईन ईआरसाठी: एक्सक्लुझिव्ह मॅट ग्रॅफाइट व ऑरोरा ब्लॅक पर्ल. या वेईकलचे केबिन अनेक इंटीरिअर डिझाईन थीम ऑफर करते, ज्यामध्ये क्लाउड ब्लू व ग्रे, ओनिक्स ब्लॅक व ऑफ-व्हाइट आणि विशेष ओनिक्स ब्लॅक व हंटर ग्रीन थीमचा समावेश आहे.
बॅटरी पॅक
ट्रिम
(४२ केडब्ल्यूएच)
एचटीके
एचटीके+
एचटीएक्स
विस्‍तारित रेंज (५१.४ केडब्ल्यूएच)
एचटीके+ ईआर
एचटीएक्स ईआर
एचटीएक्स+ ईआर
एक्स-लाईन ईआर

*नियम व अटी लागू: लाइफटाइम वॉरंटी १५ वर्षे मानली जाईल. अधिक तपशीलांसाठी, कृपया आपल्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments