Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorized'रंग बना रहे': बर्जर पेंट्सकडून आपल्यातील रंगांचा उत्सव साजरा करणाऱ्या नवीन मोहिमेचा...

‘रंग बना रहे’: बर्जर पेंट्सकडून आपल्यातील रंगांचा उत्सव साजरा करणाऱ्या नवीन मोहिमेचा शुभारंभ

राष्ट्रीय,27-7-2026 : बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड या देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या पेंट कंपनीने एका प्रभावी विश्वासावर आधारित नवीन ब्रँड ओळखचे अनावरण केले आहे: आयुष्यात कितीही संकटे आली तरी आपला रंग कधीही पुसट होऊ नये. ‘रंग बना रहे’ या विचारातून साकार झालेली ही नवीन मोहीम मानवी दृष्टिकोनातून बर्जर पेंट्सच्या रंग टिकवून ठेवण्याच्या दीर्घकालीन आश्वासनाचा नवा अर्थ मांडते. अशा श्रेणीमध्ये जिथे ब्रँड्स अनेकदा एकसारखे दिसतात आणि रंगाचा बाह्य अभिव्यक्ती म्हणून उत्सव साजरा केला जातो, तिथे बर्जर एका विशिष्ट ब्रँड ओळख आणि वेगळ्या दृश्यमान सादरीकरणासह वेगळा दृष्टिकोन देते.

अनेक दशकांपासून, बर्जरने होमशील्डच्या मदतीने रंगांचे संरक्षण केले आहे, जे पावसापासून रक्षण करते; वेदरकोट अँटी डस्ट, जे धूळ दूर ठेवते; आणि ईजी क्लीन, जे रोजच्या डागांना प्रतिबंध करते. या कटिबद्धतेने कंपनीची उत्पादने, नवनवीन शोध आणि लाखो घरांमध्ये कंपनीचे स्थान निर्माण केले आहे. ‘रंग बना रहे’ या मोहिमेद्वारे बर्जर रंगांचे रक्षण करण्याचे हे चिरंतन आश्वासन भिंतींच्या पलीकडे माणसांपर्यंत घेऊन जाते. ‘रंग बना रहे’ हा रंगांइतकाच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील आहे. ज्याप्रमाणे बर्जरचा रंग प्रत्येक ऋतूत टिकून राहतो, त्याचप्रमाणे ही मोहीम आयुष्यात कितीही संकटे आली तरी आपल्या व्यक्तिमत्त्वातील आणि आत्म्यातील रंग टिकवून ठेवण्याच्या स्थिरतेचा उत्सव साजरा करते.

या मोहिमेची सुरुवात खुशरंगी असलेल्या जाहिरातीने होते, ज्याचे रंग कधीही फिके पडत नाहीत, मग ते शब्दशः असो वा लाक्षणिक. पाऊस, धूळ किंवा उष्णतेचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही, अगदी त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात त्याचा उत्साह अबाधित राहतो. त्याचा दिवस उलगडत जातो, तसतसे ही जाहिरात मानवी स्थिरतेची ताकद दाखवते. ही जाहिरात आपल्याला आठवण करून देते की, खरी ताकद आयुष्यातील आव्हाने टाळण्यात नाही, तर ती आव्हाने असूनही आपण जे आहोत ते टिकवून ठेवण्यात आहे.

या मोहिमेबद्दल मत व्यक्त करत बर्जर पेंट्स इंडियाचे एमडी आणि सीईओ अभिजित रॉय म्हणाले, “अनेक वर्षांपासून बर्जर ईजी क्लीन आणि अँटी डस्ट सारख्या उत्पादनांच्या माध्यमातून रंगांचे संरक्षण करण्यासाठी ओळखले जाते. आम्ही ब्रँडच्या भविष्याकडे पाहिले, तेव्हा स्वतःला विचारले की, रंगांचे संरक्षण करणे म्हणजे नेमके काय? आमच्या लक्षात आले की, हे केवळ भिंतींपुरते मर्यादित नाही, तर ते माणसांबद्दल आहे आणि आयुष्यातील चढ-उतारात आपण जे आहोत ते टिकवून ठेवण्याच्या ताकदीबद्दल आहे. ‘रंग बना रहे’ या विचारामागील हीच भावना आहे. ही एक विशिष्ट ओळख आहे, जी रंगांचे संरक्षण करण्याच्या आमच्या आश्वासनाला अधिक मानवी आणि अर्थपूर्ण पद्धतीने सादर करते. बर्जरचे कोटिंग्ज प्रत्येक ऋतूत रंगांचे संरक्षण करतात, त्याचप्रमाणे ‘रंग बना रहे’ मोहीम आपली ओळख असणारे रंग न गमावता आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्याच्या स्थिरतेचा उत्सव साजरा करते.”

साइडवेज कन्सल्टिंगचे संस्थापक अभिजित अवस्थी म्हणाले, “ही मोहीम केवळ रंगांबद्दल दुसरी एखादी जाहिरात तयार करण्यासाठी नव्हती, तर असा एक विचार शोधण्यासाठी होती, ज्यावर केवळ बर्जरचा अधिकार असू शकतो. संरक्षक कोटिंग्जमधील त्यांच्या अग्रगण्य स्थानाने आम्हाला ते आश्वासन अधिक मानवी करण्याची संधी दिली. ‘रंग बना रहे’ हे मुळात स्थिरता आणि आव्हानांवर मात करणाऱ्या आनंदाचा उत्सव आहे, आयुष्यात काहीही घडले तरी आपले रंग टिकवून ठेवण्याचा शांत निश्चय आहे. ओळखीपासून ते जाहिरातीपर्यंत प्रत्येक गोष्ट याच एका विचारातून निर्माण झाली आहे.”

विविध प्रदेशांतील व्यक्तींशी जोडले जाण्यासाठी मोहिमेचा जाहिरात अनेक भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात आली आहे. ही मोहीम देशभरात टेलिव्हिजन, डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि इतर विविध ग्राहक माध्यमांवर राबवली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments