Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्प्राईटची नवीन मोहीम ‘स्पाइसी लगा, स्प्राईट उठा'मध्ये स्प्राईटची ब्रँड ॲम्बेसेडर शर्वरी आणि...

स्प्राईटची नवीन मोहीम ‘स्पाइसी लगा, स्प्राईट उठा’मध्ये स्प्राईटची ब्रँड ॲम्बेसेडर शर्वरी आणि सुनिल ग्रोवर एकत्र

 

 

 

31 जुलै २०२६: स्प्राईट हे लेमन व लाइमची चव असलेले प्रसिद्ध पेय ‘स्पाइसी लगा, स्प्राईट उठा’ मोहिमेद्वारे आपल्या चवीचा दर्जा अधिक वाढवत आहे. तिखट खाण्याची आवड असणाऱ्या आणि तिखटाच्या मर्यादा ओलांडायला आवडणाऱ्या धाडसी पिढीकडून प्रेरणा घेऊन ही मोहीम तिखट लागल्यावर स्प्राईटला एक उत्तम साथीदार म्हणून सादर करते, जे आस्वाद घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक घासाची चव आणखी वाढवते.

 

या मोहिमेच्या केंद्रस्थानी तिखटप्रेमींची एक सोपी सवय आहे, ती म्हणजे तिखट (स्पाइसी) लागल्यावर थंडगार स्प्राईट पिणे. हाच विचार विनोदी पद्धतीने मांडण्यासाठी, या मोहिमेच्या व्हिडिओमध्ये युथ आयकॉन आणि स्प्राईटची ब्रँड ॲम्बेसेडर शर्वरी कॉमेडी कलाकार सुनिल ग्रोवर यांच्यासोबत एका हॉटेलच्या पार्श्वभूमीत दिसते. सुनिल ग्रोवर आपल्या खास शैलीत एकामागोमाग एक चमचमीत पदार्थ वाढतात, तेव्हा शर्वरी पदार्थांचा आस्वाद घेत असताना थंडगार स्प्राईटकडे हात वळवते. स्प्राईटची ही ताजी लेमन-लाइम चव प्रत्येक तिखट घासाला परिपूर्ण बनवते आणि आस्वाद घेण्याचा आनंद उत्साहवर्धक करते.

 

कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्ट एशियाच्या स्पार्कलींग फ्लेव्हर्सच्या कॅटेगरी हेड सुमेली चॅटर्जी म्हणाल्या, “तिखट खाण्याचे वाढते प्रमाण हा केवळ एक ट्रेंड नसून ते ग्राहक आठवणीत राहणारे खाद्यपदार्थांचे अनुभव शोधत असल्याचे दर्शवते. ‘स्पाइसी लगा, स्प्राईट उठा’ मोहीम या बदलत्या खाद्यसंस्कृतीला जोडते. व्यक्तींच्या आवडत्या तिखट पदार्थांची चव स्प्राईटच्या ताज्या लिंबू-लेमन चवीसोबत अधिक मजेदार बनते, ज्यामुळे प्रत्येक घास आणि घोट आनंददायी ठरतो. या वर्षी आम्ही प्रत्यक्ष अनुभव आणि डिजिटल भागीदारीच्या माध्यमातून ही मोहीम ग्राहकांच्या अधिक जवळ घेऊन जात आहोत, जिथे ते फूडचा शोध घेतात, आस्वाद घेतात आणि एकत्र क्षण साजरा करतात.”

 

शर्वरी म्हणाल्या, “स्प्राईट नेहमी तरुण ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी मजेशीर आणि जवळचे वाटणारे मार्ग शोधते आणि या मोहिमेबद्दल मला हीच गोष्ट सर्वात जास्त आवडते. ‘स्पाइसी लगा, स्प्राईट उठा’ मोहीम आपल्यापैकी अनेकजण आधीपासून करत असलेल्या एका गोष्टीचा आनंद साजरा करते, ती म्हणजे मसालेदार खाद्यपदार्थांसोबत थंडगार स्प्राईट पिणे. हे सोपे, ताजेतवाने आणि उत्साहाने भरलेले आहे, आणि प्रत्येकाने याचा अनुभव घ्यावा यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

 

सुनिल ग्रोवर म्हणाले, “स्पाइसी फूड नेहमी जेवणात उत्साह आणते, आणि तिखट लागल्यावर स्प्राईट उत्तम साथीदार ठरतो. या मोहिमेचे शूटिंग करताना खूप मजा आली, कारण यात जेवणातील नेहमीचे क्षण विनोदी पद्धतीने दाखवले आहेत. मला आशा आहे की, प्रेक्षकांना ही जाहिरात पाहायला आवडेल आणि अर्थातच, ते त्यांच्या पुढील तिखट जेवणाचा आनंद स्प्राईटसोबत घेतील.”

 

या मोहिमेचा भाग म्हणून, स्प्राईट देशभरातील २०० हून अधिक ब्रँड भागीदारांसोबत सहयोग करेल, ज्यामध्ये बर्गर किंग, वाव! मोमो आणि तबास्को यांसारख्या प्रमुख क्यूएसआर व फूड ब्रँड्सचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या तिखट पदार्थांसोबत थंडगार स्प्राईट पिण्यास आवाहन केले जाईल. या मोहिमेत देशभरात ऑन-पॅक ऑफर देखील सादर केली जाईल, ज्याद्वारे ग्राहकांना कोरियाकरिता उत्साहवर्धक ट्रिप जिंकण्याची संधी मिळेल, ज्यामुळे प्रत्येक तिखट घासाचा (स्पाइसी बाइटचा) आनं

द आणखी वाढेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments