Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedबार्टी संस्थेच्यावतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

बार्टी संस्थेच्यावतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

 

 

पुणे, दि. १: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस समाजकल्याण आयुक्त तथा बार्टीच्या महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ -मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

स्वारगेट येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास श्रीमती मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बार्टीचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड, रवींद्र कदम, समाजकल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments