सुधारित केबिन इंटिरिअर्ससह मुंबई-टोरंटो दरम्यान नवीन हंगामी सेवा
दिल्ली-टोरंटो विमानांमध्ये नवीन केबिन सुविधा
जानेवारी 2027 पासून टोरंटोसाठी 100% नवीन किंवा सुधारित सुविधांचा वापर
या हिवाळ्यात मुंबई-टोरंटो विमानसेवा चालवणारी एकमेव विमान कंपनी
उच्च-गुणवत्तेचे व्हिज्युअल साहित्य येथे उपलब्ध: https://we.tl/t-GFxaVvkCxaByGoai
गुरुग्राम, 01 ऑगस्ट 2026: दिल्ली-टोरंटो मार्गावर एअर इंडियाने आपले अगदी नवीन B787-9 विमान आज सेवेत रुजू केले. यामुळे एअरलाइनची अद्ययावत केबिन सुविधा आणि प्रवासादरम्यानचा उत्कृष्ट अनुभव पहिल्यांदाच कॅनडापर्यंत पोहोचणार असून, प्रवाशांच्या प्रवासाचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आधारित, एअर इंडियाने 2026-27 च्या हिवाळी हंगामासाठी कॅनडातील आपल्या सेवांचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
मुंबई आणि टोरंटो दरम्यान नवीन थेट (नॉन-स्टॉप) सेवा
भारत आणि कॅनडा दरम्यानच्या एकूण प्रवासी क्षमतेत दरमहा 4,400 जागांची (सीट्सची) वाढ
टोरंटोसाठीच्या प्रीमियम श्रेणीतील जागांच्या क्षमतेत 71% वाढ
नवीन, हंगामी मुंबई-टोरोंटो सेवा, सुधारित अंतर्गत सजावटीसह
25 ऑक्टोबर 2026 ते 26 मार्च 2027 दरम्यान एअर इंडिया मुंबई आणि टोरोंटो दरम्यान आठवड्यातून तीन वेळा थेट विमानसेवा सुरू करणार आहे. यामुळे भारत आणि कॅनडासाठी दर आठवड्याला जवळपास 2,000 जागांची भर पडेल. तसेच या दोन शहरांदरम्यान थेट विमानसेवा चालवणारी ही एकमेव विमान कंपनी ठरेल.
एअर इंडियाच्या बोईंग 777-300ईआर विमानाद्वारे ही सेवा चालवली जाईल, ज्याच्या केबिनच्या अंतर्गत सजावटीत लक्षणीय सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रायव्हसी स्लाइडिंग डोअर्ससह 8 आलिशान फर्स्ट क्लास स्वीट्स, बिझनेस क्लासमध्ये 40 फ्लॅट बेड्स आणि इकॉनॉमीमध्ये 280 जागांचा समावेश आहे.
मुंबई आणि टोरोंटो दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सुधारित B777-300ER विमानात वायफाय इंटरनेट कनेक्टिव्हिटीचाही लाभ मिळेल.
एअर इंडियाच्या मुंबई आणि दिल्ली येथील प्रमुख केंद्रांच्या माध्यमातून, कॅनडाला जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या प्रवाशांना अहमदाबाद, अमृतसर, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, हैदराबाद, कोची, लुधियाना आणि वडोदरा यांसारख्या अनेक भारतीय शहरांशी सहजपणे जोडले जाणे शक्य होते.
जानेवारी 2027 पासून टोरोंटोसाठी 100% नवीन किंवा सुधारित उत्पादनांचा वापर
या हिवाळ्यात एअर इंडियाच्या दिल्ली-टोरोंटो मार्गावरील 10 साप्ताहिक उड्डाणांपैकी, 7 साप्ताहिक सेवा नवीन बोईंग 787-9 विमानांद्वारे चालवल्या जातील, ज्यात एअरलाइनची नवीन केबिन प्रॉडक्ट्स असतील. उर्वरित 3 साप्ताहिक सेवा सुरुवातीला बोईंग 777-300ईआर विमानांद्वारे चालवल्या जातील आणि ताफ्यात अधिक विमाने आल्यावर जानेवारी 2027 पासून त्या नवीन बोईंग 787-9 विमानांमध्ये रूपांतरित होतील.
त्यामुळे, टोरोंटोला येणाऱ्या आणि जाणाऱ्या एअर इंडियाच्या सर्व उड्डाणांमध्ये पूर्णपणे नवीन किंवा लक्षणीयरित्या सुधारित केबिन इंटिरियर्स असतील, ज्यामुळे प्रवाशांना एकसारखा प्रीमियम अनुभव मिळेल.
दिल्ली आणि मुंबईहून टोरोंटोसाठी नवीन तसेच अद्ययावत विमाने तैनात केल्यामुळे, एअर इंडियाला या हिवाळ्यात टोरोंटो मार्गावरील प्रीमियम श्रेणीतील जागांची क्षमता 71 टक्क्यांनी वाढवणे शक्य झाले आहे; परिणामी प्रवाशांना फर्स्ट क्लास, बिझनेस क्लास आणि प्रीमियम इकॉनॉमीचे अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
एअर इंडियाचे मुख्य कमर्शिअल अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले: “कॅनडा ही एअर इंडियाच्या सर्वात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपैकी एक आहे. येथील लोकांचे एकमेकांशी असलेले घनिष्ठ संबंध प्रवासाची मोठी मागणी निर्माण करतात, विशेषतः सणांचे दिवस आणि सुट्ट्यांच्या काळात. या हिवाळ्यात सुरू होणारी आमची हंगामी मुंबई-टोरंटो सेवा प्रवाशांना अधिक पर्याय आणि सोय उपलब्ध करून देईल; हा असा काळ आहे जेव्हा अनेक लोक आपल्या कुटुंबीयांना आणि मित्र-परिवाराला भेटण्यासाठी प्रवास करत असतात. त्याच वेळी, उत्तर अमेरिकेच्या मार्गावर आम्ही आमची अत्याधुनिक विमाने आणि विमानातील अद्ययावत सुविधा टप्प्याटप्प्याने सादर करत आहोत. जगातील सर्वात स्पर्धात्मक अशा लाँग-हॉल अर्थात दीर्घ पल्ल्याच्या बाजारपेठांपैकी एका बाजारपेठेत सर्वोत्तम सेवा देण्याचा आमचा संकल्प यातून सिद्ध होतो. एकत्रितपणे, हे उपक्रम एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमानसेवा कंपनी बनवण्यासोबतच भारताला जगाशी जोडणारे पसंतीचे माध्यम म्हणून प्रस्थापित करण्याच्या आमच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.”
टोरोंटोला जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या विमानांचे वेळापत्रक:
उड्डाण #
कुठून कुठे
प्रस्थान
आगमन
किती वेळा
विमान
AI187
दिल्ली-टोरांटो
0145 Hrs
0930 Hrs
दररोज
एकदम नवीन
B787-9
AI188
टोरांटो-दिल्ली
1230 Hrs
1405 Hrs (+1)
दररोज
AI189
दिल्ली-टोरांटो
1025 Hrs
2135 Hrs
बुध, शुक्र, रवि
B777-300ER
AI190
टोरांटो-दिल्ली
0035 Hrs
0150 Hrs (+1)
गुरु, शनि, सोम
AI193
मुंबई-टोरांटो
0400 Hrs
1000 Hrs
बुध, शुक्र, रवि
सुधारित
B777-300ER
AI192
टोरांटो-मुंबई
1230 Hrs
1410 Hrs (+1)
बुध, शुक्र, रवि
सर्व वेळा स्थानिक वेळेनुसार. (+1) पुढच्या दिवसाचे आगमन दर्शवते.
एअर इंडिया संकेतस्थळ आणि मोबाइल ॲप, ग्राहक संपर्क केंद्र आणि जगभरातील ट्रॅव्हल एजंट्स अशा विविध माध्यमांतून विमानांची तिकिटे आरक्षित करता येतील.
2026-27 च्या हिवाळी हंगामात, एअर इंडिया भारत ते कॅनडा दरम्यान दर आठवड्याला एकूण 20 विमाने चालवणार आहे; यामध्ये दिल्ली ते टोरंटो (आठवड्याला 10), मुंबई ते टोरंटो (आठवड्याला 3) आणि दिल्ली ते व्हँकुव्हर (आठवड्याला 7) अशा उड्डाणांचा समावेश असेल.


