Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedभोसरी–दिघी मार्गावरील मुख्य मलवाहिनी बदलण्याचे काम; नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन 

भोसरी–दिघी मार्गावरील मुख्य मलवाहिनी बदलण्याचे काम; नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन 

 

 

 

 

पिंपरी, दि. १ ऑगस्ट २०२६ : भोसरी–दिघी मार्गावरील संत निरंकारी सत्संग भवनासमोरील मुख्य ड्रेनेज वाहिनी चोकअप झाल्यामुळे दिघी (शिवनगर) परिसरातील अनेक घरांमध्ये मैलापाणी शिरण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयामार्फत, क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य मलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असून, या कामासाठी संत निरंकारी सत्संग भवनासमोरील इंद्रधनू सोसायटीसमोरील रस्त्याची खोदाई करण्यात येणार आहे.

 

 

 

या कामादरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भोसरी–दिघी मार्गावरील या ठिकाणची वाहतूक अंदाजे ४ ते ५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४, ५, ६ आणि ७ तसेच भोसरी व दिघी परिसरातील नागरिकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

मुख्य मलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दिघी (शिवनगर) परिसरातील मैलापाणी तुंबण्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण होण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाच्या वतीने आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि तांत्रिक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

 

 

 

ई क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे यांनी नागरिकांना कामाच्या कालावधीत वाहतुकीचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आ

वाहन केले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments