Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedध्रुव ग्लोबल स्कूलच्या सानवी जाधवची राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी; पटकावली एक...

ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सानवी जाधवची राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी; पटकावली एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदके

 

 

पुणे, दि २:उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची चौथीतील विद्यार्थिनी सानवी सागर जाधव हिने राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर चमकदार कामगिरी केली आहे. झारखंडमधील रांची येथे पार पडलेल्या १२व्या रँकिंग ओपन नॅशनल स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप २०२६ (८ ते १० वयोगट) मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सानवीने एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई करत बाजी मारली.

 

देशभरातून आलेल्या अव्वल दर्जाच्या स्केटर्सच्या आव्हानाला सामोरे जात सानवीने आपल्या गती आणि स्केटिंगवरील पकडीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या इयत्ता चौथी ‘ब’ मध्ये शिकणाऱ्या सानवीने मिळवलेले यश संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.

 

कठोर मेहनत आणि शिस्तबद्ध सरावाचे फळ

 

सानवीच्या या दैदिप्यमान यशामागे तिची जिद्द, नियमित सराव आणि कठोर मेहनत कारणीभूत आहे. तिच्या या यशामुळे ध्रुव ग्लोबल स्कूल परिवार, तिचे कुटुंबीय आणि प्रशिक्षकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

 

ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशोवर्धन मालपाणी, अनिष्का मालपाणी आणि शाळेच्या प्राचार्या शारदा राव यांनी सानवीचे विशेष अभिनंदन करून तिला भावी क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. सानवी भविष्यातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

 

संस्थेने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या आधुनिक पायाभूत सुविधा आणि डॉ. संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनामुळेच आमचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश संपादन करत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments