Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedकौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करून धमक्या देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल चोरडिया विरोधात...

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करून धमक्या देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल चोरडिया विरोधात तातडीने गुन्हा दाखल करा- विनोद धुमाळ 

 

 

पिंपरी (प्रतिनिधी)दि.३ ऑगस्ट २०२६ :- भोसरी येथील कौटुंबिक मिळकतीच्या विकासाच्या व्यवहारात विशाल चोरडिया कन्ट्रक्शन प्रा. लि. चे डायरेक्टर कुणाल दिलीप चोरडिया यांनी आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करत विनोद अनंता धुमाळ यांनी आज (दि.३) पिंपरी येथील नमस्कार हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. कुणाल चोरडिया या व्यावसायिकांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी दापोडी पोलिसांकडे केली आहे.

 

यावेळी धुमाळ म्हणाले की, वडील दिलीप मोतीलाल चोरडिया, मुलगा कुणाल दिलीप चोरडिया आणि मध्यस्थी प्रफुल्ल इनामदार यांच्या सोबत व्यवहाराची बोलणी झाल्यानंतर दि. २२/१२/२००६ रोजी कुलमुखत्यारपत्र दस्त नं. १०३९७/२००६ व विकसन करारनामा दस्त नं. १०३९६/२००६ अन्वये मा. दुय्यम निबंधक कार्यालय हवेली नं. १७ मध्ये कायदेशीररीत्या कुणाल चोरडिया यांच्या नावे नोंदविण्यात आलेला आहे. सदर दस्तांवाये कुणाल दिलीप चोरडिया हा आम्हास सदर मिळकतीच्या विकसनाच्या बदल्यात व्यावसायिक बांधकामातील तळ मजल्यावर एक दुकान तसेच व ६५० चौ.फुटाचा सुपर बिल्ट अपचा एक फ्लॅट चार वर्षात देण्याचे मान्य व कबूल केलेले होते.या आश्वासनावर विश्वास ठेवून कुटुंबाने मिळकत विकासासाठी देण्यास संमती दर्शविली. मात्र, व्यवहार झाल्यानंतर जवळपास २० वर्षे उलटूनही विकासकाम सुरू झाले नाही आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही.

 

अनेक वेळा संबंधितांकडे पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने देण्यात आली. अखेर मोबदला अथवा मिळकत परत मिळावी, अशी मागणी केल्यानंतर यावेळी कुणाल चोरडिया आणि प्रफुल्ल इनामदार यांनी धमकावण्यास सुरुवात केली. “तुला काय करायचे ते कर आम्ही तुझ्या सारखे हजार लोक बघितले आहे आणि तुम्ही आमचे काही वाकडे करू शकणार नाही तुला आमच्याकडून काही मिळणार नाही आणि जर आमच्याशी पंगा घेतला तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलची खडी फोडायला पाठवेन मग रहा ६०० स्के. फुट मध्ये अशी धमकी दिली आहे” त्यावेळी कुणाल चोरडिया तेथेच होता त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरवात केली व शर्टाची कॉलर पकडून म्हणाला की, आमच्या नांदी लागू नको आमच्याकडे खूप पैसे आहेत आम्ही कोणालाही खरेदी करू शकतो आणि जास्त नाटक केल तर तुला कुठे मारून गायब करेन हे तुला आणि तुझ्या घरच्यांना कळणार नाही. “माझी मोठ्या मोठ्या भाई लोकांशी चांगली ओळख आहे आणि आमचे सारखे सोबत उठणे बसने आहे, अशी धमकी दिली आहे आणि तुला काही मिळणार नाही तुला कुठल्या पोलीस स्टेशनाला जायचे तिकडे जा आमचे कोणी काही वाकडे करू शकणार नाही.या संदर्भात दापोडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असूनही अद्याप संबंधितांविरोधात अपेक्षित कारवाई झालेली नाही.”सामान्य नागरिकाला न्याय मिळण्यासाठी वारंवार पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी धुमाळ यांनी केली.

 

माझी कोणाशीही वैयक्तिक वैरभावना नाही. मात्र माझ्या कुटुंबाची फसवणूक झाली असून मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. व्यवहाराशी निगडित कागदपत्रे, तक्रारींच्या प्रती आणि इतर माहितीही पोलिसांना दिली आहे. तसेच, या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर पुढील काळात वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे दाद मागण्याबरोबरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही धुमाळ यांनी दिला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments