Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सकडून पाटणा येथे ॲडवान्‍स्‍ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी - Re.Wi.Re चे उद्घाटन

टाटा मोटर्सकडून पाटणा येथे ॲडवान्‍स्‍ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी – Re.Wi.Re चे उद्घाटन

पाटणा, ४ ऑगस्ट २०२६: भारताच्‍या शाश्‍वत गतीशीलता आणि चक्रिय अर्थव्‍यवस्‍थेप्रती परिवर्तनाला चालना देण्‍याच्‍या आपल्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज पाटणा, बिहार येथे आपल्या अत्याधुनिक Re.Wi.Re – (रिसायकल विथ रिस्‍पेक्‍ट) फॅसिलिटीच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. बिहार सरकारचे माननीय परिवहन मंत्री श्री. दामोदर रावत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली ही रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्‍हीएसएफ) दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांसह सर्व ब्रँड आणि सर्व वाहनांच्या श्रेणीतील कालबाह्य वाहने सुरक्षितपणे आणि जबाबदारीने विघटन (स्क्रॅप) करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.

५.५ एकर क्षेत्रात पसरलेली पाटणा आरव्हीएसएफ कलाहानू बोथरा ग्रुपद्वारे चालवली जाते आणि प्रतिवर्ष १५,००० पर्यंत वाहने सुरक्षितपणे विघटन (स्क्रॅप) करण्याची क्षमता आहे.

या फॅसिलिटीचे उद्घाटन करत बिहार सरकारचे माननीय परिवहन मंत्री श्री. दामोदर रावत म्हणाले, “पाटणा येथे या रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीची सुरुवात होणे हे राज्यासाठी अधिक सुरक्षित रस्ते आणि स्वच्छ वाहतूक परिसंस्थेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नॅशनल वेईकल स्क्रॅपेज धोरणाला अनुसरून, सुविधा जुनी आणि अयोग्य वाहने वैज्ञानिक व जबाबदार मार्गाने टप्प्याटप्प्याने हटवण्यास मदत करेल, तसेच वाहनधारकांना नवीन, अधिक सुरक्षित आणि जास्त इंधन-कार्यक्षम वाहनांकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करेल. आपल्या वाहन ताफ्याचे आधुनिकीकरण करणे हे संपूर्ण बिहारमध्ये उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी आवश्यक आहे. मी टाटा मोटर्स आणि कलाहानू ग्रुपचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन करतो आणि राज्यात सुरक्षित व शाश्वत गतिशीलतेला पुढे नेणाऱ्या अशा आणखी प्रयत्‍नांची अपेक्षा करतो.”

या उपक्रमाबद्दल मत व्यक्त करत टाटा मोटर्स लिमिटेडचे ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्हणाले, “आमच्या पाटणा फॅसिलिटीचे उद्घाटन हे देशभरातील कालबाह्य वाहनांसाठी जबाबदार, संघटित परिसंस्था उभारण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. नॅशनल वेईकल स्क्रॅपेज धोरणाने अयोग्य आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांचे टप्प्याटप्प्याने विघटन (स्क्रॅप) करण्यासाठी एक रचनाबद्ध चौकट तयार केली आहे आणि चांगल्या प्रकारे डिझाइन केलेल्या प्रोत्साहनांद्वारे, वाहनधारकांना स्वच्छ व अधिक इंधन-कार्यक्षम वाहनांकडे जाण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. चक्रिय अर्थव्यवस्थेच्या तत्त्वांनी प्रेरित होऊन, आम्ही वार्षिक सुमारे २ लाख कालबाह्य वाहने जबाबदारीने विघटन (स्क्रॅप) करण्यासाठी रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीजच्या देशभरातील सर्वात मोठ्या जाळ्याने सुसज्ज आहोत. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही आमचे भागीदार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचे आणि सहयोगाचे मनापासून कौतुक करतो.”

या विस्‍तारीकरणासह टाटा मोटर्स आता जयपूर, भुवनेश्‍वर, सुरत, चंदिगड, दिल्‍ली एनसीआर, पुणे, गुवाहाटी, रायपूर, लखनौ, कोलकाता, अहमदाबाद आणि पाटणा येथे १२ वेईकल-स्‍क्रॅपिंग सेंटर्सचे कार्यसंचालन पाहते.

प्रत्‍येक Re.Wi.Re फॅसिलिटी पूर्णत: डिजिटलाइज आहे आणि सर्व कार्यसंचालने विनासायास व पेपरलेस आहेत. या फॅसिलिटीज कमर्शियल वेईकल्‍स, दुचाकी व तीन-चाकींसाठी सेल-टाइप डिस्‍मॅन्‍टलिंग आणि पॅसेंजर वेईकल्‍ससाठी लाइन-टाइप डिस्‍मॅन्टलिंगसह सुसज्‍ज आहेत. तसेच टायर्स, बॅटऱ्या, इंधन, ऑईल्‍स, लिक्विड्स व गॅसेस् अशा विविध घटकांच्‍या सुरक्षित विघटनासाठी समर्पित स्‍टेशन्‍स आहेत. प्रत्‍येक वेईकल विशेषत: पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍सच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन केलेल्‍या प्रखर डॉक्‍यूमेन्‍टेशन व विघटन प्रक्रियेमधून जातात. यामधून देशातील वेईकल स्‍क्रॅपेज धोरणानुसार सर्व घटकांचे सुरक्षित विघटन होण्‍याची खात्री मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments