पुणे: मिस अँड मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन २०२६ या स्पर्धेच्या सातव्या पर्वाचा भव्य अंतिम सोहळा २ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यातील हयात पुणे येथे दिमाखात पार पडला. DIVA पेजंट्सचे संस्थापक अंजना आणि कार्ल मस्कारेन्हास यांनी या स्पर्धेची संकल्पना मांडली होती. ट्रूपीक यांच्या सहकार्याने आयोजित या सोहळ्यात देशभरातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.
बॉलिवूड अभिनेत्री अंजना सुखानी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षक मंडळात कार्ल मस्कारेन्हास, डॉ. लीना गुप्ता, राधिका भट्टाचार्य शाह, विद्या तिवारी, डॉ. विक्रमादित्य साल्वी, वरुण त्रिपाठी आणि निवेदिता बसू यांचा समावेश होता. दूरचित्रवाणी क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व अमन यतन वर्मा यांनी आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अधिकृत विजेत्या :
प्लॅटिनम –
विजेत्या: सुषमा शर्मा
प्रथम उपविजेत्या: सोमदत्ता गांगुली
द्वितीय उपविजेत्या: वैशाली ठाकूर
एलिट –
विजेत्या: मोनेका नगडा
प्रथम उपविजेत्या: शिल्पा सुधाकरन
द्वितीय उपविजेत्या: स्मिता जालन
गोल्ड –
विजेत्या: रिदमा काकानी
प्रथम उपविजेत्या: प्रीती सिंह
द्वितीय उपविजेत्या: हनी सिंह
सिल्व्हर –
विजेत्या: लता पांडे
प्रथम उपविजेत्या: अपूर्वा दीक्षित
द्वितीय उपविजेत्या: डॉ. मिहिका सूर्यवंशी
मिस –
विजेत्या: हिमांशी शर्मा
प्रथम उपविजेत्या: प्रियांका कदम
आंतरराष्ट्रीय किताब :
मिसेस GAIA वर्ल्ड इंडिया २०२६: मिसेस महाराष्ट्र २०२५च्या विजेत्या आरती बोरोलेना मिसेस GAIA वर्ल्ड इंडिया २०२६ हा किताब प्रदान करण्यात आला. त्या मलेशियात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
जागतिक प्रतिनिधी: झलक माहेश्वरी आणि कांचन रायपुरे यांनीही आंतरराष्ट्रीय किताब मिळवत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला.
या भव्य कार्यक्रमाचे दिग्दर्शन नृत्यदिग्दर्शक पूजा सिंह यांनी केले. स्पर्धकांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि प्रशिक्षणाची जबाबदारी सिसिलिया सन्याल यांनी स्नेहा अग्रवाल आणि फरजाना लकडावाला यांच्या सहकार्याने सांभाळली.
DIVA पेजंट्सचे संस्थापक अंजना आणि कार्ल मस्कारेन्हास म्हणाले, “आमचे व्यासपीठ महिलांना त्यांच्या खऱ्या क्षमतेचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि त्यांना धाडस करा, स्वप्न पाहा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाने उजळून निघा, अशी प्रेरणा देते.”
अधिक माहितीसाठी :
वेबसाइट: www.divapageants.com DIVA पेजंट्स: +91 9175065640


