निसान एसयूव्हीच्या ७५ वर्षांच्या वारशाचा उत्सव साजरा करत ६० न्यू निसान टेक्टॉन प्रीमियम एसयूव्हींनी पाच दिवसांची ७००+ किमीची हिमालयीन क्षमता मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवले आहे
गुरूग्राम, ०५ ऑगस्ट २०२६: निसान मोटर इंडिया प्रा. लि. ने (एनएमआयपीएल) निसान एसयूव्हीच्या उत्कृष्टतेची ७५ वर्षे साजरी करताना एका ऐतिहासिक वाहन क्षमतेचे प्रदर्शन करून ‘लेहला पोहोचणारा एकाच मॉडेलच्या चारचाकी वाहनांचा सर्वात मोठा ताफा’ या अधिकृत विक्रमाद्वारे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले आहे. न्यू निसान टेक्टॉन प्रीमियम एसयूव्हीच्या ६० गाड्यांच्या ताफ्याने पाच दिवसांची हिमालयीन मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यात ७०० किमी पेक्षा जास्त अंतर कापले गेले. हा ताफा चंदीगड (१,०५३ फूट) पासून सुरू होऊन शिंकू ला पास (१६,७०३ फूट) आणि नंतर लेह (११,४८० फूट) येथे पोहोचला. या मोहिमेने निसानच्या नवीन प्रीमियम एसयूव्हीची क्षमता, टिकाऊपणा आणि अभियांत्रिकी सामर्थ्य दाखवून दिले.
या विक्रमी मोहिमेत न्यू निसान टेक्टॉनने महामार्ग आणि पर्वतीय खिंडी, बदलत्या हवामानाचा सामना केला आणि उंच पर्वतीय प्रदेश पार केला. एक महत्त्वपूर्ण यश नोंदवण्याबरोबरच चंदीगड – मनाली – झांगला मार्गे शिंकू ला येथून सुरू होऊन लेह येथे समाप्त होणाऱ्या या प्रवासात टेक्टॉन गाडी प्रत्यक्ष ड्रायव्हिंगच्या आव्हानात्मक परिस्थितीत कशी कामगिरी करते हे दाखवून दिले. या संपूर्ण मार्गावर टेक्टॉनचा ताफा माध्यम प्रतिनिधी आणि उद्योग तज्ञांनी चालवला.
या कामगिरीबाबत बोलताना निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, श्री. सौरभ वत्स म्हणाले, “न्यू निसान टेक्टॉनसह इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करणे हा निसान मोटर इंडियासाठी एक अभिमानाचा क्षण आहे आणि आमच्या ७५ वर्षांच्या एसयूव्ही क्षेत्रातील उत्कृष्टतेचा हा एक योग्य सोहळा आहे. हा विक्रम महत्त्वपूर्ण असला तरी ही कामगिरी आम्ही प्रतिनिधित्व करत असलेल्या बाबीमुळे अधिक अर्थपूर्ण ठरते. साठ टेक्टॉन एसयूव्हींनी एक आव्हानात्मक हिमालयीन ड्राईव्ह यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीत वाहनाची क्षमता, टिकाऊपणा आणि अभियांत्रिकी सामर्थ्य सिद्ध झाले. हा टप्पा निसानच्या त्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, जी ग्राहकांना त्यांच्या प्रवासात कुठेही आत्मविश्वास देणाऱ्या प्रीमियम एसयूव्ही देते करते. तसेच भारतातील विविध ड्रायव्हिंग वातावरणात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तयार केलेले वाहन म्हणून न्यू टेक्टॉनवरील आमचा विश्वासही यातून दृढ होतो.”
या कामगिरीबद्दल: इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समधील ही मान्यता निसानच्या दीर्घकालीन एसयूव्ही परंपरेला अधिक बळकट करते. तसेच न्यू टेक्टॉनची विविध आणि आव्हानात्मक भूप्रदेशांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता अधोरेखित करते. निसानच्या आयकॉनिक पॅट्रोलपासून प्रेरित या प्रीमियम एसयूव्हीमध्ये आकर्षक डिझाइन, जपानी कारागिरी, प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान, गुगल प्लेद्वारे २०० हून अधिक ॲप्सच्या वापरासह गूगल बिल्ट-इन आणि १००% टर्बोचार्ज्ड इंजिन लाइन-अप यांचा संगम आहे. संपूर्ण मार्गावर ६० टेक्टॉन गाड्यांचा ताफा उद्योग क्षेत्रातील तज्ञ आणि माध्यम प्रतिनिधींनी चालवला.
निसानच्या “वन कार, वन वर्ल्ड” या तत्त्वज्ञानानुसार चेन्नई येथील कारखान्यात उत्पादित ऑल न्यू निसान टेक्टॉन ही भारतीय ग्राहकांसाठी आणि मध्य पूर्व व आफ्रिका अशा बाजारपेठांमध्ये निर्यातीसाठी भारतातच डिझाइन केली आहे.
ऑल न्यू निसान टेक्टॉन टर्बो टी१६० रेंजसाठी १०.४९ लाख रुपये आणि टर्बो टी२८० रेंजसाठी १४.९९ लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या विशेष प्रारंभीच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. देशभरातील निसानच्या रिटेल नेटवर्क आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर बुकिंग सुरू आहे. ग्राहकांना गाड्यांची डिलिव्हरी २० जुलै २०२६ पासून सुरू झाली आहे.
अधिक माहितीसाठी कृपया www.nissan.in या संकेतस्थळाला भेट द्या.
निसान अमिओबाबत (आफ्रिका, मध्य पूर्व, भारत, युरोप आणि ओशनिया)
निसान आपल्या ‘दैनंदिन जीवनासाठी गतिशील बुद्धिमत्ता’ या दीर्घकालीन दृष्टिकोनाने प्रेरित आहे. तो गतिशीलता अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि सुलभ बनवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान दैनंदिन अनुभवांमध्ये आणतो. ग्राहककेंद्री दृष्टिकोन आणि नावीन्यावर लक्ष केंद्रित करून निसान लोकांच्या प्रवासाच्या पद्धतीत परिवर्तन घडवत आहे आणि अधिक जोडलेले, सहज आणि समाधानकारक गतिशीलतेचे अनुभव निर्माण करत आहे.
हा दृष्टिकोन पुढे नेण्यात अमिओ प्रदेश महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. आपल्या विविध बाजारपेठांमध्ये निसान विद्युतीकृत गतिशीलतेची उपलब्धता वाढवत आहे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर करत आहे आणि ग्राहकांना मूल्य प्रदान करणाऱ्या व शाश्वत वाढीस चालना देणाऱ्या धोरणात्मक भागीदारी निर्माण करत आहे.
निसानची उत्पादने, सेवा आणि बुद्धिमान गतिशीलतेप्रती असलेल्या वचनबद्धतेबद्दल अधिक माहितीसाठी nissan-global.com ला भेट द्या. तुम्ही आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि लिंक्डइनवर फॉलो करू शकता आणि आमचे सर्व नवीन व्हिडिओ यूट्यूबवर पाहू शकता.


