हिंजवडी फेज १ मधील नदीकिनारी प्रीमियम घरे; एकात्मिक टाऊनशिपमधील सर्व सुविधा एका छताखाली
पुणे, ३० जुलै २०२६ : परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लिमिटेडने हिंजवडी फेज १ येथील आपल्या १५० एकरांच्या ब्ल्यू रिज टाऊनशिपमध्ये ‘द प्रोमेनेड रेसिडेन्सेस’ या नव्या प्रीमियम निवासी प्रकल्पाचे अनावरण केले आहे. आधुनिक वास्तुरचना, प्रशस्त घरे, मुळा नदीचे विहंगम दृश्य आणि एकात्मिक टाऊनशिपमधील सर्व सुविधा यांचा संगम या प्रकल्पात पाहायला मिळणार आहे.
पुण्यातील प्रमुख एकात्मिक टाऊनशिप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्ल्यू रिजमध्ये निवासी संकुले, व्यावसायिक कार्यालये, आयसीएसई शाळा, अत्याधुनिक स्पोर्ट्स क्लब, हाय स्ट्रीट रिटेल, कॅफे, रेस्टॉरंट्स तसेच ९ होल गोल्फ कोर्स अशा सुविधा उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध जीवनशैली देण्याच्या संकल्पनेतून हा नवा प्रकल्प साकारण्यात आला आहे.
३२ मजली असलेल्या या प्रकल्पात प्रत्येक मजल्यावर केवळ तीनच घरे आहेत. त्यामुळे रहिवाशांना अधिक गोपनीयता आणि प्रशस्त राहणीमानाचा अनुभव मिळणार आहे. प्रत्येक घरातून एका बाजूला मुळा नदीचे, तर दुसऱ्या बाजूला ब्ल्यू रिज टाऊनशिप आणि पुणे शहराचे विहंगम दृश्य दिसणार आहे. घरांमध्ये भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
हिंजवडी फेज १ मधील आयटी पार्क आणि व्यावसायिक केंद्रांच्या जवळ असल्यामुळे या प्रकल्पाला उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी लाभली आहे. शिक्षण, आरोग्य, खरेदी, मनोरंजन आणि दैनंदिन गरजांच्या सुविधा टाऊनशिपमध्येच उपलब्ध असल्याने रहिवाशांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
यावेळी परांजपे स्कीम्सचे बिझनेस डेव्हलपमेंट संचालक अमित परांजपे म्हणाले, “गृहखरेदीदार आता केवळ घर नव्हे, तर उत्तम पायाभूत सुविधा, दर्जेदार परिसर आणि भविष्यात अधिक मूल्य मिळवून देणारी जीवनशैली शोधत आहेत. गेल्या काही वर्षांत हिंजवडी फेज १ हा परिसर वेगाने विकसित झाला असून प्रीमियम घरांसाठी तो पसंतीचे ठिकाण ठरत आहे. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबईशी संपर्क अधिक वेगवान झाला आहे. या बदलत्या गरजा लक्षात घेऊन ब्ल्यू रिजमध्ये नदीकिनारी आधुनिक आणि प्रीमियम जीवनशैली देणारा ‘द प्रोमेनेड रेसिडेन्सेस’ विकसित करण्यात आला आहे.”
या प्रकल्पातील रहिवाशांना ९ होल गोल्फ कोर्स, जलतरण तलाव, फिटनेस सेंटर, डान्स स्टुडिओ, बिझनेस हब, रिटेल अव्हेन्यू, वर्क पॉड्स, कम्युनिटी पॅव्हेलियन, मुलांसाठी खेळाची मैदाने, आर्ट स्टुडिओ, सेलिब्रेशन हॉल, मीटिंग लाऊंज, नेचर डेक, क्रेच, रिक्रिएशन लाऊंज आणि विस्तीर्ण हिरवळीचा लाभ मिळणार आहे.
घरांच्या रचनेत प्रशस्त लिव्हिंग आणि डायनिंग एरिया, वॉक-इन वॉर्डरोब, पाहुण्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आणि मुळा नदीकडे पाहणारे खासगी डेक यांचा समावेश करण्यात आला आहे. आधुनिक सुविधा, उत्कृष्ट नियोजन आणि निसर्गाच्या सान्निध्यातील जीवनशैली यांचा समतोल साधणारा हा प्रकल्प ब्ल्यू रिजच्या वारशात आणखी एक महत्त्वाची भर ठरणार आहे.
परांजपे स्कीम्सविषयी
१९८९ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लिमिटेडने गेल्या ३५ वर्षांत पुणे, मुंबई, बेंगळुरू आणि वडोदरा यांसह नऊ शहरांमध्ये २०० हून अधिक निवासी व व्यावसायिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. २ कोटी चौरस फुटांहून अधिक बांधकाम आणि ७५ हजारांहून अधिक रहिवाशांचा विश्वास मिळवत कंपनीने रिअल इस्टेट क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ब्ल्यू रिज, फॉरेस्ट ट्रेल्स, आथश्री, आस्था आणि स्वनिकेतन यांसारख्या संकल्पनांमधून कंपनी सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देत आहे.


