पुणे, ५ ऑगस्टः “माईर्स एमआयटी शिक्षण संस्था मानवतेचा मुळ गाभा पकडून विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण देत आहेत. शिक्षणाचा बहुअंगाने विकास होत असतांना ज्ञान, विज्ञान, अध्यात्म आणि विश्वशांतीसाठी शिक्षण देऊन नवी पिढी निर्माण केली जात आहे. कितीही कठिण प्रसंग आला तरी आपले मनोधैर्य खचू द्यायचे नाही व विश्वास गमवायचा नाही.” असे मत डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्यूएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणेचे चान्सलर डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचा ४४ वा वर्धापन दिवस कोथरुड कॅम्पसमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी माईर्स एमआयटचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, विश्वस्त व सचिव प्रा.स्वाती कराड -चाटे, विश्वस्त डॉ. विनायक घैसास, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. दत्ता दंडगे, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर आणि डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
यावेळी विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना संत तुकाराम महाराज यांची पगडी, घोंगडी आणि तुळशीचीमाळ घालून विशेष सत्कार करण्यात आला.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“जीवनामध्ये नम्रता अत्यंत महत्वाची आहे. सत्याच्या अनुभूतीसाठी नम्रता अंगिकारावी लागते. आजचा दिवस आंतरिक समाधानाचा व जीवनातील वेगळी अनुभूती देणारा दिवस आहे. ४४ वर्षापूर्वी केलेल्या संकल्पाला दिशा मिळाली आहे.”
डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले,“मूल्याधिष्ठित नागरिक घडवावा या विचारातून शिक्षण संस्था कार्यरत आहे. आधुनिक युगात एआय चा उपयोग शिक्षण क्षेत्रात कशा पद्धतीने करता येईल या दिशेने आता पाऊले उचलावीत. ही संस्था विचारांवर कार्य करणारी आहे. अशा वेळेस समाजातील कठिण समस्या ओळखून त्या सोडविण्यासाठी कार्य करावे.”
माईर्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संस्थेच्या चढत्या कार्याचा आढावा सांगितला.
प्रा.प्रकाश जोशी म्हणाले,“५ ऑगस्ट १९८३ साली लावलेले बीज आज वटवृक्षात बदलेले आहे. सर्वांच्या परिश्रमाने ही संस्था मोठी झाली. त्यामुळे पुढील काळात एक सिस्टीम डेव्हलप करावी लागणार आहे.”
डॉ. दत्ता दंडगे म्हणाले,“ज्ञानाचा उपयोग समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा या साठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. यंत्र, तंत्रादी विज्ञानम्, लोककल्याण साधनम् या सूत्रानुसार डॉ. विश्वनाथ कराड यांनी शिक्षणाचा प्रसार केला आहे. ”
या नंतर माईर्स शिक्षण संस्था समूहातील विविध शाखांमधील उल्लेखनीय सेवा देणार्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना मानपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये नॉन टिचिंग स्टॉफ मध्ये माईर्स हेड ऑफिसच्या चित्रा साठे, हिराचंद कराड, डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा.गणेश पोकळे, एडीटी युनिव्हर्सिटीचे डॉ. ज्ञानदेव निलवर्ण, लातूर येथील एमआयएमएसआरचे माणिक आगाव, तळेगांव मेडिकल कॉलेजचे पांडुरंग सावंत, आळंदी येथील एमआयटी एसीएस कॉलेजच्या संगीता कुलकर्णी, विश्वशांती गुरूकुल स्कूलचे महेश सिंग परदेशी, कोथरुड येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या कुंडलिक वीर, आळंदी येथील डीव्हीके वर्ल्ड स्कूलचे बाळू करंडे आणि लोणी येथील विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. छगन खरतोडे यांचा समावेश आहे. तर टीचिंग स्टॉफ मध्ये एमआयटी डब्ल्यूपीयूच्या डॉ. निवेदिता गोगटे, एडीटीचे प्रा.डॉ. नचिकेत ठाकुर, उज्जैन येथील अवंतिका युनिव्हर्सिटीचे डॉ. वरुण तिवारी, आळंदी येथील एमआयटी अॅकॅडमिक ऑफ इंजिनियरींगचे प्रो. सुनिलकुमार भगत, तळेगाव मेडिकल कॉलेजचे डॉ. संध्या कुलकर्णी, लातूर येथील डॉ.श्रवण एस.एस, कोथरुड येथील निलम वाघ, माईर्स एमआयटी विश्वशांती स्कूल, कोथरुडच्या सोनाली सिंघम आणि डीव्हीके वर्ल्ड पीस स्कूल, लातूरचे रजनी कदम यांचा समावेश आहे.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी आभार मानले.


