Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedविमान अपघाताची' विनाविलंब चौकशी होऊन अजितदादांना न्याय मिळण्यासाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस'ने शक्ती...

विमान अपघाताची’ विनाविलंब चौकशी होऊन अजितदादांना न्याय मिळण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने शक्ती खर्च करावी..! भाजप’च्या अजेंड्यावर चालू नये…! ⁃ काँग्रेस’ चे विनम्र आवाहन..

⁃
पुणे – दि ५ ॲागस्ट
सुनेत्रा पवार यांनी कोणाच्याही दबावाखाली न राहता उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून आपला राजधर्म निभवावा, एवढीच् काँग्रेसची स्पष्ट अपेक्षा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा जाणीवपूर्वक विपर्यास करून, ‘अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस’चे नेते राजकीय आकांडतांडव करत आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सुनेत्रा पवार या ‘गुंगी गुडिया आहेत असे म्हटलेले नसुन, त्यांनी ‘गुंगी गुडिया ‘बनू नये’, असे म्हटले आहे.
या दोन्ही विधानांतील स्पष्ट फरक समजून न घेता काँग्रेसवर टीका करणे म्हणजे भाजपने दिलेला अजेंडा राबविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे अशी प्रखर टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.
गोपाळदादा पुढे म्हणाले, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत पालकमंत्र्यांना पत्रकार परीषदेत प्रश्न विचारला जात असताना, धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता काय होती..?
मा सुनेत्राताई पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतः कायदा-सुव्यवस्थेबाबत पत्रकारांना उत्तर देणे अपेक्षित होते. त्यांना उत्तर देण्यापासून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे रोखण्याचा प्रयत्नच् त्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारा आणि त्यांच्या उपस्थितीत ती पत्रकार परीषद अप्रत्यक्ष नियंत्रित करण्याचा निषेधार्ह प्रकार आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसविरोधात शक्तिप्रदर्शन करण्याऐवजी, मस्साजोग च् सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होऊन त्यांना न्याय देण्याची भुमिका घ्यावी त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची निष्पक्ष, पारदर्शक व उच्चस्तरीय चौकशी आतातरी विना विलंब होऊन अजितदादांना न्याय मिळवुन देण्यासाठी आवाज उठवावा हीच त्यांना खरी श्रध्दांजली व हाती असलेल्या सत्ता धर्माचे पालन होईल असे प्रतिपादन ही काँग्रेस चे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
आमदार रोहित पवार यांनी या चौकशीसंदर्भात उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचीही राज्य सरकारने स्पष्ट उत्तरे द्यायला हवीत. कोणताही निष्कर्ष आधीच न काढता सत्य जनतेसमोर आणणे ही सरकारची जबाबदारी आहे.
पुढे ते म्हणाले, जेष्ठ नेते मा शरदरावजी पवार आणि अजितदादा पवार यांचे नेतृत्व घडविण्यामध्ये काँग्रेसच्या पक्षाचेच मोठे योगदान आहे. काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षांच्या पुरोगामी, धर्मनिरपेक्ष सत्तेच्या परंपरेत मा अजीतदादांना उत्तम प्रशासक होण्याची व घडण्याची संधी लाभली हे देखील विसरता येणार नाही. अनेक दशके “काँग्रेस परिवारात वावर व अस्तित्व राहील्याने” पवार कुटुंबिय व स्व अजितदादांचे प्रती पुर्वाश्रमीच्या आत्मियतेच्या भावनेतून व ‘अ.प.राकाँ’चे अस्तित्व गृहीत धरून
मा सुनेत्राताईं कडून, राजधर्म_पालनाच्या अपेक्षे पोटी कायदा सुव्यवस्था व राज्याच्या हितार्थ, राजकीय गरजेने व प्रसंगी उदीग्नतेने व हक्काने सांगण्याचा प्रयत्न केला तर एवढी आदळआपट करण्याची ‘अ.प. राष्ट्रवादी काँग्रेस’ला गरज नव्हती. मात्र भाजप’ची उप शाखा बनू पहात असलेल्या पक्षा कडून दुसरी अपेक्षा ही करणे चुकीचे ठरेल अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.
काँग्रेस ने पवार कुटुंबातील नेत्यांना सतत वाव, प्रतिष्ठा व सत्ता दिली, उलट पक्षी भाजप शीर्ष नेतृत्वाने अजितदादा व पवार कुटुंबातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपच केले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील जागावाटपातही राष्ट्रवादीला सापत्न पणाची वागणूक दिली मात्र त्यावेळी मौन बाळगणारे नेते आज भाजप नेत्यांच्या चिथावणीवर काँग्रेस विरोधात आक्रमक होतात हे सखेद आश्चर्य म्हणावे काय..? असा सवाल ही त्यांनी केला.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपची उपशाखा बनून, काँग्रेसजनांना शत्रू समजून वागू नये. भाजपला खूश करण्यासाठी चालविलेले काँग्रेसविरोधी राजकारण उद्याच्या भविष्यात बाधक ठरू नये याची जाणीव रहावी व शब्दांचा विपर्यास थांबवून कायदा-सुव्यवस्था, ‘संतोष देशमुख व विमान अपघात’ याची सत्वर चौकशीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपली राजकीय शक्ती वापरावी असे आवाहन ही गोपाळदादा तिवारी यांनी केले आहे.
————————————

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments