Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedKSB लिमिटेडची दमदार कामगिरी; Q2 मध्ये ₹690.70 कोटीची विक्री दिल्ली...

KSB लिमिटेडची दमदार कामगिरी; Q2 मध्ये ₹690.70 कोटीची विक्री दिल्ली मेट्रो सह नाशिक कुंभमेळा जलसुविधा प्रकल्पाची ऑर्डर

पिंपरी : पंप, व्हॉल्व्ह आणि सिस्टीम्स क्षेत्रातील जागतिक अग्रगण्य कंपनी KSB लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत (Q2) सातत्यपूर्ण व्यवसायात वाढ नोंदवली आहे. कंपनीची विक्री ₹690.70 कोटी इतकी झाली असून विविध औद्योगिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांत महत्त्वाच्या ऑर्डर्स मिळाल्याने आगामी काळातील व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.

या तिमाहीत कंपनीला गदरवारा ऊर्जा प्रकल्पासाठी पहिली LUV पंप ऑर्डर, कैगा अणुऊर्जा प्रकल्पासाठी शटडाउन कूलिंग पंप, एनटीपीसीच्या नबीनगर आणि गदरवारा प्रकल्पांसाठी HP व्हॉल्व्ह पॅकेज, महावितरणकडून 2000 सौर पंपांचा लेटर ऑफ इंटेंट, दिल्ली मेट्रोच्या HVAC पंप प्रकल्पाची ऑर्डर, नाशिक कुंभमेळा जलसुविधा प्रकल्प, डेटा सेंटर तसेच पवनऊर्जा क्षेत्रातील पहिली कूलिंग पंप ऑर्डर प्राप्त झाली आहे.

कंपनीचे उपाध्यक्ष (विक्री व विपणन) श्री.प्रशांत कुमार यांनी विविध क्षेत्रांतील ऑर्डर्समुळे ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे सांगितले. मुख्य वित्त अधिकारी श्री. महेश भावे यांनी महसुलात सकारात्मक वाढ कायम असून कार्यक्षमतेवर आणि खर्च नियंत्रणावर कंपनीचे लक्ष केंद्रित असल्याचे नमूद केले.

कंपनीच्या मते, औद्योगिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीमुळे आगामी काळातही मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स मिळ

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments