Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चतुर्थ सरसंघचालक प.पू.राजेंद्रसिंह जी तथा रज्यूभैय्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त पर्वती...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चतुर्थ सरसंघचालक प.पू.राजेंद्रसिंह जी तथा रज्यूभैय्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त पर्वती येथील “कौशिक आश्रम” येथे रविवारी येत्या ९ ऑगस्ट रोजी *भव्य रक्तदान शिबिर*

पुणे
(बातमीदार/प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चतुर्थ सरसंघचालक प.पू.राजेंद्रसिंह जी तथा रज्यूभैय्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त पर्वती येथील मित्रमंडळ कॉलनी मधील “कौशिक आश्रम” येथे येत्या रविवारी नऊ ऑगस्ट रोजी कौशिक आश्रम व
अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर आयोजनचे यंदाचे हे २२ वे वर्ष आहे.
सकाळी आठ वाजता “पूना गणेशखिंड लायन्स क्लब”चे अध्यक्ष विकास अग्रवाल यांच्याहस्ते ह्या शिबिराचे उद्घाटन होणार असून “डॉ कदम डायग्नोसिस सेंटर “चे संचालक डॉ विजय कदम ह्यांची प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य उपस्थिती राहणार आहे.
“जनकल्याण रक्तपेढी”च्या सहकार्याने हे शिबिर कौशिक आश्रम च्या नूतन
वास्तूमध्ये पहिले रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे.
तरी जास्तीत जास्त जणांनी सकाळी आठ ते पाच या वेळेत मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन कौशिक आश्रम व अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे
*रक्तदान* – *सर्वश्रेष्ठ दान*
…….

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments