Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिमालया बेबीकेअरचे नवे 'मॅची मॅची पीएच' कॅम्पेन, बाळाच्या त्वचेचा नैसर्गिक पीएच समतोल...

हिमालया बेबीकेअरचे नवे ‘मॅची मॅची पीएच’ कॅम्पेन, बाळाच्या त्वचेचा नैसर्गिक पीएच समतोल राखण्याचे महत्त्व पटवून देणार ~ विविध भाषांमधील कॅम्पेन निरोगी आणि सुरक्षित त्वचेसाठी पीएच ५.५ च्या सौम्य देखभालीवर भर देणार ~

राष्ट्रीय, ५ ऑगस्ट, २०२६: भारतातील सर्वांत विश्वासार्ह आणि लाडका ब्रँड ‘हिमालया बेबीकेअर’ने आपले नवीन ‘मॅची मॅची पीएच’ कॅम्पेन सुरू केले आहे. बाळाच्या नाजूक त्वचेचा नैसर्गिक पीएच समतोल राखणे का महत्त्वाचे आहे, हे या कॅम्पेनमधून सांगितले जात आहे. या कॅम्पेनअंतर्गत कंपनीने ‘हिमालया बेबीकेअर पीएच ५.५ जेंटल रेंज’ सादर केली असून, यामध्ये हिमालया जेंटल बेबी शॅम्पू, हिमालया जेंटल बेबी वॉश, जेंटल बेबी लोशन आणि जेंटल बेबी क्रीम या उत्पादनांचा समावेश आहे. ही उत्पादने बाळाच्या त्वचेच्या पीएचशी तंतोतंत जुळत असल्यामुळे त्वचेचे नैसर्गिक संरक्षण कवच मजबूत राहते, ओलावा टिकून राहतो आणि बाळाला डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण व सौम्य देखभाल मिळते.

या कॅम्पेनसाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल फिल्ममध्ये पालकांच्या रोजच्या जगण्यातील एक गोड क्षण दाखवला आहे. फिल्ममध्ये एक आई आपल्या बाळाला आवडीने मॅचिंग कपडे घालते आहे आणि त्याच वेळी ती आणखी एका महत्त्वाच्या मॅचची म्हणजेच बाळाच्या त्वचेच्या पीएचची आठवण करून देते. आपल्या बाळाची प्रत्येक छोटी छोटी गोष्ट परफेक्ट मॅच असावी यावर पालकांचा भर असतो, पण बाळाची त्वचा सुरक्षित, मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी तिच्या नैसर्गिक पीएचशी मॅच होणारी उत्पादने वापरणेही तितकेच महत्त्वाचे आहे, याची आठवण हे कॅम्पेन करून देते. याची टॅगलाईन “मॅची मॅची पीएच” देखील सोपी आणि लक्षात राहणारी आहे. हिमालया बेबीकेअरची पीएच ५.५ जेंटल रेंज बाळाच्या त्वचेचा नैसर्गिक पीएच समतोल राखते, त्वचेचे संरक्षण कवच मजबूत करते आणि ओलावा टिकवून ठेवते, हे या फिल्ममध्ये दाखवले आहे.

बाळाची त्वचा प्रौढांच्या तुलनेत खूप नाजूक असते आणि तिला विशेष देखभालीची गरज असते, या महत्त्वाच्या मुद्द्यावर हे कॅम्पेन आधारित आहे. पालकांनी रोजच्या साध्या स्किनकेअरच्या पलीकडे जाऊन बाळाच्या त्वचेचे नैसर्गिक संरक्षण कवच मजबूत करणारी उत्पादने निवडावीत, हा या कॅम्पेनचा संदेश आहे. निरोगी त्वचेची सुरुवात योग्य पीएच समतोल राखण्यापासून होते, हा विचार पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिमालया बेबीकेअरने एका रंजक आणि हलक्या-फुलक्या कथेचा वापर केला आहे.

हिमालया वेलनेसचे बेबीकेअर विभागाचे संचालक चक्रवर्ती एन. व्ही. म्हणाले: “पालकांनी घेतलेले छोटे आणि योग्य निर्णय बाळाच्या त्वचेसाठी किती महत्त्वाचे ठरू शकतात, हे पटवून देणे हा हिमालया बेबीकेअरचा प्रयत्न असतो; जेणेकरून पालकांची चिंता मिटेल आणि बाळाची काळजी घेणे सोपे होईल. पालक आपल्या बाळासाठी प्रत्येक गोष्ट खूप विचारपूर्वक निवडतात. बाळाची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तिचा नैसर्गिक पीएच समतोल राखणे, हासुद्धा असाच एक महत्त्वाचा निर्णय आहे. ‘मॅची मॅची पीएच’ कॅम्पेनच्या माध्यमातून आम्हाला पालकांमध्ये ही जाणीव निर्माण करायची आहे की, बाळाच्या नाजूक त्वचेचे रक्षण करण्यासाठी पीएच समतोल असलेली उत्पादने किती गरजेची आहेत. यामुळे पालकांना दररोज विश्वासाने बाळाची सुरक्षित आणि सर्वोत्तम काळजी घेता येईल.”

या कॅम्पेनमध्ये ‘हिमालया बेबीकेअर पीएच ५.५ जेंटल रेंज’ सादर करण्यात आली आहे. यामध्ये हिमालया जेंटल बेबी शॅम्पू, जेंटल बेबी वॉश, जेंटल बेबी लोशन आणि जेंटल बेबी क्रीम या उत्पादनांचा समावेश आहे. बाळाच्या त्वचेचा नैसर्गिक पीएच समतोल राखण्यासाठी ही उत्पादने खास तयार करण्यात आली असून, ती त्वचेचे नैसर्गिक संरक्षण कवच मजबूत ठेवतात आणि ओलावा टिकवून त्वचा मऊ व निरोगी ठेवण्यास मदत करतात.

हे कॅम्पेन डिजिटल आणि सोशल मीडियावर चालवले जात असून, देशभरातील पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रादेशिक पातळीवरही याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला जात आहे. हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, मराठी, बंगाली, ओडिया आणि आसामी अशा विविध भाषांमध्ये हे उपलब्ध आहे. भारतातील प्रत्येक कुटुंबाला बाळाच्या त्वचेच्या देखभालीविषयी सोप्या भाषेत माहिती मिळावी, हा यामागचा उद्देश आहे.

पालकत्वाच्या प्रवासात सुरक्षित, सौम्य आणि विज्ञानावर आधारित उत्पादनांची खंबीर साथ देण्याची हिमालया बेबीकेअरची वचनबद्धता ‘मॅची मॅची पीएच’ कॅम्पेनच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिसून येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments