इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या (प्रति शेअर 10 रु.) तुलनेत फ्लोअर प्राईस 5.70 पट आणि कॅप प्राईस 6.00 पट निश्चित करण्यात आली आहे.
बोली/ऑफर सोमवार, 17 ऑगस्ट 2026 रोजी खुली होईल आणि बुधवार, 19 ऑगस्ट 2026 रोजी बंद होईल. (“Bid Dates”)
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार, 14 ऑगस्ट 2026 आहे.
बोली किमान 250 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 250 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“No. of Bids”)
कंपनीने डीआरएचपी दाखल करण्यापूर्वी डिसेंबर 2025 मध्ये 360 वन, एसबीआय लाइफ, राधाकिशन दमानी आणि इतर गुंतवणूकदारांकडून खासगी प्लेसमेंटच्या माध्यमातून 1,650 कोटी रु. उभारणीची प्राथमिक फेरी पूर्ण केली होती.
आरएचपी लिंक: https://www.jmfl.com/Common/getFile/5906
12 ऑगस्ट 2026: होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स लिमिटेड (“कंपनी”) सोमवार, 17 ऑगस्ट 2026 पासून इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) च्या अनुषंगाने बोली/ऑफर खुली करणार आहे.
प्रती इक्विटी शेअरसाठी 57 रु. ते 60 रु. असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. (“Price Band”).
बोली किमान 250 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 250 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“Minimum Bid Lot”).
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार, 14 ऑगस्ट 2026 असून बोली/ ऑफर सोमवार, 17 ऑगस्ट 2026 पासून सुरु होत आहे.
या इश्यूमध्ये प्रती 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचे 26,000 दशलक्ष रु. पर्यंत रकमेचे संपूर्णपणे फ्रेश इश्यू समाविष्ट आहेत.
ब्लॅकस्टोनचे भारतातील रिअल इस्टेट विभागाचे प्रमुख अशिष मोहता म्हणाले: “भारतामधील औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रावर केंद्रित पहिला आयपीओ सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. हा ब्लॅकस्टोनचा देशातील पंधरावा आयपीओ आणि सातवी रिअल इस्टेट लिस्टिंग देखील आहे. भारतीय भांडवली बाजारात नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि आमच्या गुंतवणूकदारांसाठी संधींचा विस्तार करण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांची ही पुढील पायरी आहे. उच्च दर्जाची मालमत्ता, नामांकित भाडेकरू आणि आर्थिक विकासाचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असलेले भारतातील सर्वात मोठे औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स प्लॅटफॉर्म म्हणून होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सची उभारणी केल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी उर्विश रामभिया म्हणाले: “हा आयपीओ होरायझन इंडस्ट्रियल पार्क्ससाठी अभिमानाचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अवघ्या सहा वर्षांत, ब्लॅकस्टोनची जागतिक व्याप्ती, या क्षेत्रातील सखोल अनुभव आणि मजबूत कार्यान्वयन क्षमता यांच्या पाठबळावर आम्ही भारतातील सर्वात मोठा औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स प्लॅटफॉर्म म्हणून विकसित झालो आहोत. औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा या उत्पादन क्षेत्राच्या आणि आर्थिक विकासाच्या अत्यंत महत्त्वाच्या आधारस्तंभ आहेत. भारताच्या विकासाच्या पुढील टप्प्याला पाठबळ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधांची उभारणी सुरू ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
कंपनीकडून फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर पुढील बाबींसाठी करण्याचा प्रस्ताव आहे:
i) कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची अंशतः किंवा पूर्णतः परतफेड आणि/किंवा आगाऊ परतफेड
ii) काही पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांनी घेतलेल्या काही कर्जांची अंशतः किंवा पूर्णतः परतफेड आणि/किंवा आगाऊ परतफेड
iii) सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी
या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर करण्यात येणाऱ्या इक्विटी शेअर्सची सूचीबद्धता बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”, आणि BSE सोबत संयुक्तपणे “स्टॉक एक्स्चेंजेस”) या शेअर बाजारांवर करण्याचा प्रस्ताव आहे. या इश्यूसाठी NSE हे निर्देशित स्टॉक एक्स्चेंज आहे.
जेएम फायनान्शियल लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वी आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड), एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि 360 वन डब्ल्यूएएम लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार नियम 32(1) च्या नियमनात ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (अ) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ब) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी, परंतु अट अशी की SEBI ICDR नियमांनुसार देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी राखीव प्रमुख गुंतवणूकदार श्रेणीमध्ये कमी सदस्यता (under-subscription) झाल्यास, तो हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंड्सना वाटप केला जाऊ शकतो. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये (प्रमुख गुंतवणूकदार हिस्सा वगळून)(“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील.
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या Net QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल. पुढे, ऑफर पैकी 15% पेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी (अ)एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा अधिक आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. तसेच, ऑफरच्या किमान 10% हिस्सा रिटेल वैयक्तिक बोलीदारांसाठी (“RIBs”) सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार (“Retail Portion”) उपलब्ध असेल, त्यासाठी त्यांच्याकडून ऑफर किमतीएवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे.
तसेच, कर्मचारी आरक्षण भागांतर्गत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना इक्विटी शेअर्सचे वाटप प्रमाणानुसार करण्यात येईल, मात्र त्यांच्याकडून इश्यू किंमत किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीला (लागू असल्यास कर्मचारी सवलत वजा केल्यानंतर) वैध बोली प्राप्त झालेल्या असणे आवश्यक आहे. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (except Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स (“SCSBs”) एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.


