Thursday, August 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedमर्सिडीज-बेंझने भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च केल्या खास सर्व्हिस योजना; लक्झरी कार मालकीचा अनुभव...

मर्सिडीज-बेंझने भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च केल्या खास सर्व्हिस योजना; लक्झरी कार मालकीचा अनुभव होणार आता आणखी शानदार

७ वर्षे जुन्या मर्सिडीज-बेंझ कार्सच्या देखभालीचा एकूण खर्च कमी करण्यासाठी ‘सर्व्हिस सिलेक्ट’ योजनेची घोषणा; मुंबईतील सर्वात मोठ्या लक्झरी सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन आणि लॉन्च केला भारतातील पहिला एआयवर चालणारा ऑटोमेटेड ‘वेहिकल स्कॅनर’.

हा मर्सिडीज-बेंझ वेहिकल स्कॅनर भारतातील कार कंपनीने सुरू केलेला पहिला एआयवर चालणारा ऑटोमेटेड स्कॅनर आहे; जो कार सुरू असतानाच तिचा संपूर्ण ३६०° डिजिटल रेकॉर्ड नोंदवतो. त्यामुळे ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा मिळते, शिवाय वेळेची मोठी बचत होते.

हा वेहिकल स्कॅनर जर्मनी, इटली, कोरिया, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड आणि टर्की यांसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आधीपासूनच यशस्वीरित्या कार्यरत आहे.

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ, संतोष अय्यर म्हणाले,
“आम्ही जुनी विचारसरणी आणि सर्व्हिसिंगच्या सध्याच्या पद्धतींमध्ये बदल करून, ग्राहकांच्या सोयीसाठी एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्याने वापर करत आहोत; जेणेकरून विक्रीनंतरच्या सेवांमध्येही मर्सिडीजसारखी सर्वोत्तम गुणवत्ता (Mercedes of Service) देता येईल. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही आमच्या खास ग्राहकांसाठी गाडीच्या देखभालीचा एकूण खर्च कमी करत आहोत, ज्यामुळे गाड्यांची सर्व्हिसिंग अधिक जलद व उत्तम होईल आणि ग्राहकांना प्रत्येक टप्प्यावर अधिक चांगले मूल्य मिळेल. भारतातील पहिल्या एआय-संचालित, ऑटोमेटेड वेहिकल स्कॅनरची सुरुवात ही पारदर्शकता, विश्वास आणि कामाचा वेग वाढवण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. यामुळे मर्सिडीज-बेंझच्या ग्राहकांना गाडी बाळगण्याचा अप्रतिम अनुभव मिळेल. एकीकडे ‘सर्व्हिस सिलेक्ट’ सारख्या योजना आमच्या सध्याच्या ग्राहकांसाठी देखभालीचा खर्च कमी करतात, तर दुसरीकडे मुंबईतील सर्वात मोठ्या लक्झरी सर्व्हिस सेंटरची सुरुवात आमच्या ग्राहकांप्रती असणारी आमची दृढ वचनबद्धता दर्शवते. आमच्या ग्राहकांना मर्सिडीज-बेंझच्या या नवीन आणि अनोख्या सर्व्हिस उपक्रमांमधून भरपूर फायदे मिळतील.”

भारतातील पहिला एआय-संचलित ऑटोमेटेड वेहिकल स्कॅनर: मुंबईतील जोगेश्वरी येथील ‘लँडमार्क कार्स’च्या सर्व्हिस सेंटरमध्ये हा स्कॅनर सुरू करण्यात आले आहे.
पारदर्शकता आणि विश्वास: ग्राहक आपल्या गाडीच्या बाहेरील भागाची सविस्तर तपासणी स्वतः पाहू शकतात. तसेच XENTRY स्कॅनर’च्या एआय फीचरमुळे त्यांना गाडीची अचूक माहिती त्वरित मिळते. यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला होईल.
वेगवान तपासणी: हाय-रिझोल्युशन कॅमेऱ्यांमुळे गाडीच्या बाहेरील स्थितीची स्वयंचलित तपासणी होते. गाडीवर कुठेही स्क्रॅच किंवा नुकसान असल्यास एआय तंत्रज्ञान ते त्वरित शोधून काढते, ज्यामुळे वेळेची मोठी बचत होते.
एआय-संचलित आधुनिक वाहन तपासणी: यामध्ये सहज आणि सोपी तपासणी, ३६०-डिग्री वेहिकल असेसमेंट, एआय आधारित डॅमेज डिटेक्शन, ओळख व गोपनीयतेचे संरक्षण, टायर व वाहनाची अचूक माहिती आणि इन्स्टंट स्कॅनिंग अशा सुविधा मिळतात.
मर्सिडीज-बेंझकडून सर्वात कमी मेंटेनन्स खर्च:
स्टार ईझ (STAR EASE) सर्व्हिस पॅकेज: ३ वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी आणि ६ वर्षांपर्यंत वॉरंटी वाढवण्याची सोय.
सर्व्हिस सिलेक्ट (Service Select): ७ वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांच्या ठराविक पार्ट्सवर २५% पर्यंत बचत. सोबत मोबिलिओ लाईटचे (Mobilio Light) फायदे, पार्ट्सवर २ वर्षांची वॉरंटी आणि तज्ञांच्या देखरेखीमुळे गाडीची रिसेल किंमत टिकून राहण्यास मदत.
सर्वात मोठे सेल्स आणि सर्व्हिस नेटवर्क:मर्सिडीज-बेंझने १४ लक्झरी सेंटर्ससह मुंबईतील आपले नेटवर्क अधिक मजबूत केले आहे. तसेच, लँडमार्क कार्सने मुंबईतील सर्वात मोठे लक्झरी सर्व्हिस सेंटर सुरू केले आहे.
लक्झरी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सर्व्हिस: संपूर्ण भारतात ९० पेक्षा जास्त सर्व्हिस टचपॉइंट्स, १२०० पेक्षा जास्त सर्व्हिस बे, ४२०० पेक्षा जास्त कर्मचारी, दररोज १२,५०० पेक्षा जास्त पार्ट्सची विक्री आणि देशभरात दर मिनिटाला ३ गाड्यांची सर्व्हिसिंग केली जाते.
भविष्यातील विस्तार: मर्सिडीज-बेंझ २०२६ च्या अखेरपर्यंत आपले २० ‘MAR 20X’ टचपॉइंट्स वाढवणार आहे.
गुंतवणूक: फ्रेंचायझी पार्टनर्सकडून ४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुंबई: भारतातील सर्वात लोकप्रिय लक्झरी कार कंपनी मर्सिडीज-बेंझने आपल्या ग्राहकांचा लक्झरी कार मालकीचा अनुभव आणखी वाढवण्यासाठी आणि गाड्यांच्या देखभालीचा एकूण खर्च कमी राखण्यासाठी अनेक नवीन सर्व्हिस योजनांची घोषणा आज केली. याच अनुषंगाने, कंपनीने मुंबईतील ‘लँडमार्क कार्स’ सर्व्हिस सेंटरमध्ये देशातील पहिला आधुनिक, एआय-संचालित ऑटोमेटेड ‘वेहिकल स्कॅनर’ लॉन्च केला आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्व्हिस काउंटरवरच गाडीच्या स्थितीचे डिजिटल मूल्यमापन करते. यामुळे ग्राहकांना अत्यंत जलद, पारदर्शक आणि अधिक चांगल्या पर्सनल सर्व्हिसचा अनुभव मिळतो. यासोबतच, मर्सिडीज-बेंझने ‘लँडमार्क कार्स मुंबई’चे उद्घाटन करून बाजारपेठेतील आपल्या नेटवर्कचा आणखी विस्तार केला आहे. हे मुंबईमध्ये कंपनीचे १४ वे लक्झरी सेंटर असून ते संपूर्ण शहरातील सर्वात मोठे लक्झरी सर्व्हिस सेंटर आहे.

लँडमार्क कार्सचे उद्घाटन आणि एआय-संचालित वेहिकल स्कॅनरची सुरुवात मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या ‘गो टू कस्टमर’ धोरणाचा भाग आहे. कंपनी आपल्या सर्व्हिस नेटवर्कमध्ये डिजिटल सर्व्हिस सोल्युशन्सवर सतत गुंतवणूक करत आहे. मर्सिडीज-बेंझ इंडियाचे हे ग्राहक-केंद्रित धोरण काही मुख्य स्तंभांवर आधारित आहे. यामध्ये गाडी बाळगण्याचा अगदी सुरळीत, सुविधाजनक अनुभव, वेळेची बचत, आणि तंत्रज्ञान व एआयच्या माध्यमातून विश्वास वाढवणे यांचा समावेश आहे. यासोबतच कंपनी ग्राहकांना ‘वाह’ अनुभव (WOW Moments) देण्यासाठी आणि पूर्ण पारदर्शकतेसह गाड्यांच्या देखभालीचा एकूण खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

मर्सिडीज-बेंझने आज आपल्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण आणि फायदेशीर सेवांचे पॅकेज सादर केले आहे:

सुविधा: एमबी. चार्ज पब्लिक (MB. CHARGE Public), एमबीएफएस (MBFS) मोबाईल ॲप आणि खास भारतासाठी भारतातच विकसित करण्यात आलेली विकेंद्रित डीलर मॅनेजमेंट सिस्टीम ‘स्कायलाईन’ (SKYLine).
वेळेची बचत: प्रीमियर एक्सप्रेस प्राईम (Premier Express Prime), फास्ट लेन बी अँड पी (Fast Lane B&P) आणि घरपोच मिळणारी डोअरस्टेप मोबाईल सर्व्हिस.
ग्राहकांचा विश्वास: एचव्ही (HV) बॅटरी रिपोर्ट, कोलिजन केअर कनेक्टेड सपोर्ट, टेलि-डायग्नोस्टिक आणि लाईव्ह ट्रॅकिंगसह मोबिलिटी असिस्टन्स, आणि शॉफर (Chauffeur) ड्रायव्हर ट्रेनिंग प्रोग्राम.
ग्राहकांची निष्ठा: भारतातील सर्वात मोठी क्लासिक कार कम्युनिटी, नियमितपणे आयोजित केले जाणारे कस्टमर एक्सपिरियन्स डेज आणि सर्व्हिस क्लिनिक्स.
ग्राहकांसाठी आनंदाचे क्षण (WOW Moments): एआय-संचालित एजंट्समुळे ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण, डिलिव्हरीनंतरचे भावनिक व संस्मरणीय क्षण, आणि दर्जेदार लाईफस्टाईल कलेक्शन उत्पादनांची मोठी श्रेणी.
सर्वात कमी मेंटेनन्स खर्च: स्टार ईझ (STAR EASE) सर्व्हिस पॅकेज, इंडस्ट्रीमधील सर्वोत्तम ३ वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी, आणि ‘ॲडव्हान्स अशुरन्स’सह वाढीव वॉरंटीची सोय.

सर्व्हिस सिलेक्ट:
‘सर्व्हिस सिलेक्ट’ हा मर्सिडीज-बेंझ इंडियाचा ७ वर्षे जुन्या वाहनांसाठीचा सर्वात मोठा ‘कस्टमर लॉयल्टी प्रोग्राम’ आहे. या अत्यंत फायदेशीर उपक्रमाचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत:

निवडक पार्ट्सवर २५% पर्यंत बचत. अतिरिक्त लाभ: मोबिलिटी असिस्टन्ससाठी ‘मोबिलिओ लाईट’चे (Mobilio Lite) फायदे. बदललेल्या पार्ट्सवर २ वर्षांची वॉरंटी. तज्ञांच्या काळजीमुळे गाडीची रिसेल व्हॅल्यू (Residual Value) टिकून राहण्यास मदत.

मर्सिडीज-बेंझचे हे सर्व्हिस सोल्यूशन्स ग्राहकांची सोय वाढवतात, वेटिंग टाईम कमी करतात, पारदर्शकता सुधारतात आणि ग्राहकांसाठी तत्पर सपोर्ट उपलब्ध करून देतात. यामुळे ग्राहकांचा लक्झरी कार मालकीचा प्रवास अत्यंत सुलभ आणि सुखाचा होतो.

लँडमार्क कार्सचे चेअरमन आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर संजय ठक्कर म्हणाले, “आमच्या ग्राहकांसाठी मुंबईत एक अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर आणि त्यासोबतच नाविन्यपूर्ण ‘वेहिकल स्कॅनर’ सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा स्कॅनर अत्यंत कार्यक्षम असून यामुळे ग्राहकांची सोय वाढेल आणि त्यांना एक उत्कृष्ट सर्व्हिसिंगचा अनुभव मिळेल. लँडमार्क कार्समध्ये आम्ही ग्राहकांना जागतिक दर्जाचा सेल्स आणि सर्व्हिस अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत. हे नवीन सेंटर मुंबईतील आमचे स्थान अधिक मजबूत करेल आणि आमचा ‘ग्राहक प्रथम’ हा दृष्टिकोन अधोरेखित करेल. मर्सिडीज-बेंझसारख्या जागतिक स्तरावर नामांकित ब्रँडचा दीर्घकालीन आणि विश्वासू भागीदार आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र अशा विविध राज्यांमध्ये आमचा विस्तार करत आम्ही या ब्रँडसोबत सातत्याने प्रगती करत आहोत.”

भारतचा पहिला एआय-संचालित, ऑटोमेटेड वेहिकल स्कॅनर:
या सेवेची सुरुवात ग्राहक गाडी घेऊन आल्या क्षणीच होते. ग्राहक जेव्हा आपली गाडी या आधुनिक स्कॅनरमधून पुढे नेतात, तेव्हा लगेचच ही तपासणी सुरू होते. काही मिनिटांतच सर्व्हिस ॲडव्हायझर टॅब्लेटसह ग्राहकाकडे पोहोचतो. या टॅब्लेटवर गाडीचा संपूर्ण डिजिटल रिपोर्ट आधीपासूनच उपलब्ध असतो. यामध्ये गाडीच्या बाहेरील स्थितीची सविस्तर माहिती, बॉडीवरील प्रत्येक लहान-मोठा डाग किंवा निशाण आणि टायरच्या थ्रेडची खोली यासारख्या सर्व गोष्टी स्पष्ट दिसतात.ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस (कागदविरहित) आहे. यामुळे ग्राहकांना अनावश्यक चालणे, प्रतीक्षा करणे आणि कागदपत्रांच्या कटकटीतून पूर्णपणे सुटका मिळते, जी सहसा पूर्वी सर्व्हिस काउंटरवर करावी लागायची.

ग्राहक स्वतः गाडीचा रिपोर्ट पाहतात, फक्त आवश्यक कामावरच चर्चा करतात आणि लगेचच सर्व्हिसला मंजुरी देतात. गाडी परत घेताना देखील या डिजिटल रेकॉर्डमुळे ग्राहकाला स्वतः गाडीभोवती फिरून तपासणी करण्याची गरज उरत नाही. प्रत्येक गाडीची तपासणी प्रत्येक वेळी अगदी याच पद्धतीने केली जात असल्यामुळे, प्रत्येक ग्राहकाला कोणताही फरक न करता नेहमी एकाच उच्च दर्जाची सर्व्हिस मिळते.

वेहिकल स्कॅनर कसा काम करतो:
जेव्हा एखादी गाडी या स्कॅनरमधून जाते, तेव्हा ३६०-डिग्री हाय-रिझोल्युशन कॅमेरा सिस्टीम गाडीच्या बाहेरील संपूर्ण स्थितीचे फोटो घेते आणि हा डेटा थेट ‘मर्सिडीज-बेंझ क्लाउड’वर पाठवते. सुरक्षेसाठी हे फोटो स्वयंचलितपणे अनामित केले जातात, म्हणजेच गोपनीयता राखली जाते. यानंतर, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञान गाडीचे बाहेरील नुकसान शोधून काढते आणि टायरच्या थ्रेडची खोली मोजते. ही सर्व माहिती कोणत्याही मॅन्युअल एंट्रीशिवाय थेट वर्कशॉप ऑर्डर आणि रिसेप्शन रिपोर्टमध्ये जोडली जाते. यामुळे स्कॅनिंगची प्रक्रिया थेट सर्व्हिस जॉबशी जोडली जाते आणि वर्कशॉपमधील कामांचे योग्य नियोजन करणे सोपे होते.

वेळेची बचत आणि कार्यक्षमता:
सर्व कागदपत्रे आणि माहिती स्वयंचलितपणे गोळा होत असल्याने आणि वाहनाचा रिअल-टाइम डेटा टॅब्लेटवर उपलब्ध असल्याने, सर्व्हिस ॲडव्हायझर्सना कागदी कामावर वेळ घालवावा लागत नाही. यामुळे ते आपला पूर्ण वेळ ग्राहकांसाठी देऊ शकतात आणि त्यांच्याशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात. याशिवाय, मॅन्युअल तपासणीत राहून जाऊ शकणाऱ्या सर्व्हिस आणि दुरुस्तीच्या जागा शोधण्यात एआय-आधारित सिस्टीम मदत करते. ही सर्व माहिती ग्राहकांसमोर त्यांच्या निर्णयासाठी स्पष्टपणे मांडली जाते.

लँडमार्क कार्स, मुंबई:
मुंबईतील लँडमार्क कार्सचे हे नवीन अत्याधुनिक ‘2S लक्झरी सर्व्हिस सेंटर’ संपूर्ण शहरातील सर्वात मोठे लक्झरी कार सेंटर आहे. तसेच एआय-संचालित ऑटोमेटेड ‘XENTRY वेहिकल स्कॅनर’ असणारे हे भारतातील पहिले सेंटर बनले आहे. अवघ्या सहा महिन्यांत तयार झालेले हे शानदार सेंटर सुमारे ५८,००० चौरस फूट क्षेत्रात पसरले आहे. या अत्याधुनिक सेंटरमध्ये गाड्यांच्या नियमित देखभालीसाठी आणि सामान्य दुरुस्तीसाठी १६ बे, बॉडी व पेंटसाठी ९ बे आणि इतर कामांसाठी ९ सपोर्टिंग बे तयार करण्यात आले आहेत.याशिवाय, येथे स्पेअर पार्ट्ससाठी ६,००० चौरस फुटांचे विशेष क्षेत्र आणि सुमारे ९५ प्रशिक्षित तज्ञांची टीम उपलब्ध आहे.

या सेंटरचे उद्घाटन मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या ‘गो टू कस्टमर’ धोरणाचा भाग आहे. या धोरणांतर्गत कंपनी प्रमुख महानगरांमध्ये आणि वेगाने उभरत्या बाजारपेठांमध्ये आपल्या नेटवर्कचा विस्तार करत आहे. मर्सिडीज-बेंझ इंडियाची वर्ष २०२६ दरम्यान २० हून अधिक जागतिक दर्जाचे लक्झरी आउटलेट्स सुरू करण्याची योजना आहे. यासाठी मर्सिडीज-बेंझचे फ्रेंचायझी पार्टनर्स पुढील दोन वर्षांत ४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments