Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहेश सूर्यवंशी यांच्या कार्याचा पुणे महापालिकेतर्फे सन्मान* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती...

महेश सूर्यवंशी यांच्या कार्याचा पुणे महापालिकेतर्फे सन्मान* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष : चार दशकाहून अधिक काळ सामाजिक सेवेत सक्रिय

पुणे : गणेशोत्सव तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, जलसंवर्धन आणि धार्मिक क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ उत्तुंग कार्य करणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांचा पुणे महानगरपालिकेतर्फे सन्मान करण्यात आला. पुणे महापालिकेच्या मुख्य भवनातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्वातंत्र्य दिनानिमित्त हा सन्मान सोहळा झाला.

महेश सूर्यवंशी यांनी १९८४ मध्ये सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवात सक्रिय सहभागाला सुरुवात केली. सन २००१ मध्ये ट्रस्टच्या विश्वस्तपदी, तर २०१० मध्ये कोषाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, आरोग्य, जलसंवर्धन, पर्यावरण आणि ग्रामविकास क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत.

निसर्ग संवर्धन अभियानातून वृक्षलागवड, तरुणांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आणि विविध धार्मिक उपक्रमांनाही त्यांनी चालना दिली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पुण्याचे ब्रँडिंग, पर्यटन वृद्धी आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे. गणेश मंडळांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्यासाठी ‘जय गणेश व्यासपीठ’ स्थापन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

सार्वजनिक विश्वस्त संस्था या सत्ताकेंद्र न होता मानवसेवेचे सेवाकेंद्र झाल्या पाहिजेत, हा त्यांचा संकल्प आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता पुणे महानगरपालिकेने त्यांचा नुकताच गौरव केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments