Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमिमांसा शैक्षणिक परिषदेत ‘ध्रुव ग्लोबल स्कूल’चा दुहेरी सन्मान; दोन मानाचे पुरस्कार पटकावले...

मिमांसा शैक्षणिक परिषदेत ‘ध्रुव ग्लोबल स्कूल’चा दुहेरी सन्मान; दोन मानाचे पुरस्कार पटकावले * स्कूलच्या प्राचार्या संगीता राऊतजी (Sangeeta Rautji)यांचा सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मान

पुणे,दि. १९: शाळा व पूर्वप्राथमिक शिक्षण संस्थांमधील उत्कृष्ट कार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शिक्षण क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव करण्यासाठी पुण्यात आयोजित मिमांसा शैक्षणिक परिषदेत ‘ध्रुव ग्लोबल स्कूल’ने आपल्या यशाची मोहर उमटवली आहे. या प्रतिष्ठित परिषदेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा दोन मानाच्या पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.
नुकतीच पुण्यात मीमांसा शैक्षणिक परिषद संपन्न झाली. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, डिजिटल साधने आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती यांसारख्या आधुनिक उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि प्रगत शैक्षणिक धोरणे राबवणाऱ्या संस्थांना या सोहळ्यात गौरविण्यात आले. परस्परसंवादी आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतींचा यशस्वी वापर केल्याबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलला सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आले. त्याचबरोबर गतिशील आणि दिशादर्शक शालेय नेतृत्वासाठी शाळेच्या प्राचार्या संगीता राउतजी(Sangeeta Rautji) यांना सर्वोत्कृष्ठ मुख्याध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आले। भविष्यातील शिक्षणाची नवी वाट चोखाळणाऱ्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या या यशाबद्दल शैक्षणिक वर्तुळातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
——-
हा दुहेरी सन्मान म्हणजे ध्रुव ग्लोबल स्कूलच्या नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती, आधुनिक तंत्रज्ञानस्नेही दृष्टिकोन आणि समर्पित नेतृत्त्वाला मिळालेली पावती आहे.
– यशवर्धन मालपाणी, कार्यकारी संचालक व विश्वस्त, ध्रुव ग्लोबल स्कूल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments