हे प्लॅटफॉर्म कुटुंबांना दर्जेदार आणि विश्वासार्ह औषधे ऑनलाइन मागवण्याची सुविधा देते तसेच नियमित औषधांच्या खर्चात 60 टक्के पर्यंत बचत करण्यास मदत करते.
बंगळुरू, 20 ऑगस्ट 2026: परवडणाऱ्या किमतीत दीर्घकाळ लागणाऱ्या औषधांची सुविधा उपलब्ध करून देणारा प्लॅटिनमआरएक्स हा प्लॅटफॉर्म तरुण व्यावसायिकांना वेगवेगळ्या शहरांमध्ये राहूनही त्यांच्या पालकांच्या नियमित औषधांची गरज पूर्ण करण्यास मदत करत आहे. यामुळे दर महिन्याच्या औषधांच्या खर्चात 60 टक्के पर्यंत बचत होऊ शकते.
या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांप्रमाणेच समान घटक (सॉल्ट कंपोझिशन) आणि गुणवत्तेची परवडणारी पर्यायी औषधे मिळू शकतात. ही औषधे थेट पालकांच्या घरी पोहोचवली जातात. त्यामुळे तरुण व्यावसायिकांना त्यांच्या पालकापासून दूर राहूनही मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार यांसारख्या दीर्घकालीन आजारांसाठी लागणारी औषधे सहजपणे पोहोचवता येतात.
प्लॅटिनमआरएक्सच्या माध्यमातून 10 लाखांहून अधिक ग्राहकांनी औषधांच्या खर्चात एकत्रितपणे 137 कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत केली आहे. सध्या हे प्लॅटफॉर्म भारतातील 19,000 हून अधिक पिन कोडवर औषधांची डिलिव्हरी करत आहे. त्यामुळे बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये राहणारे लोक आपल्या मूळ गावी राहणाऱ्या पालकांसाठी सहज औषधांची ऑर्डर देऊ शकतात.
नोकरीसाठी घरापासून दूर जाणाऱ्या तरुण भारतीयांची संख्या वाढत असल्याने ही सुविधा अधिक उपयुक्त ठरत आहे. अनेक व्यावसायिकांसाठी दूर राहून पालकांची काळजी घेणे म्हणजे औषधांच्या प्रिस्क्रिप्शनची माहिती ठेवणे, वेळेवर औषधे पुन्हा मागवणे आणि दीर्घकाळ चालणाऱ्या उपचारांचा वाढता खर्च सांभाळणे हे आव्हान असते.
उदाहरणार्थ, बंगळुरूमध्ये काम करणारा एखादा तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक लखनौमध्ये राहणाऱ्या मधुमेह असलेल्या पालकांच्या मासिक औषधांची जबाबदारी घेऊ शकतो. दोन्ही शहरांमधील अंतर जवळपास 2000 किलोमीटर असले तरी तो औषधांची ऑर्डर सहज देऊ शकतो. जर कुटुंबाचा औषधांवर दर महिन्याला सुमारे 5,000 रुपये खर्च होत असेल, तर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांनुसार आणि उपलब्ध पर्यायांनुसार परवडणारी औषधे निवडल्यास 3,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.
प्लॅटिनमआरएक्सचे सह-संस्थापक आशुतोष पांडे यांनी सांगितले, “अनेक तरुण व्यावसायिक दुसऱ्या शहरात राहून आपल्या पालकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहेत. औषधे विश्वासार्ह असावीत, वेळेवर पालकांपर्यंत पोहोचावीत आणि दीर्घकाळ परवडणाऱ्या किमतीत मिळावीत, अशी त्यांची अपेक्षा असते. प्लॅटिनमआरएक्स ही जबाबदारी सोपी करण्यासाठी आणि नियमित उपचारांमुळे येणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.”
आयआयटी आणि आयआयएमचे माजी विद्यार्थी आशुतोष पांडे आणि पियूष कुमार यांनी 2023 मध्ये प्लॅटिनमआरएक्सची स्थापना केली. ही कंपनी थेट नामांकित औषध उत्पादक कंपन्यांसोबत काम करते. औषधांच्या पुरवठा साखळीतील अनेक वितरक, स्टॉकिस्ट आणि इतर मध्यस्थांचे टप्पे कमी करून, प्लॅटिनमआरएक्स ग्राहकांना अधिक परवडणाऱ्या किमतीत औषधे उपलब्ध करून देते.
हे प्लॅटफॉर्म केवळ डब्ल्यूएचओ-जीएमपी प्रमाणित औषध उत्पादक कंपन्यांसोबत भागीदारी करते आणि लेजिटस्क्रिप्ट कडून मान्यताप्राप्त आहे. ग्राहकांना औषधे उपलब्ध करून देण्यापूर्वी तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिकांची टीम औषधांमधील घटक (सॉल्ट) आणि त्यांची रचना (फॉर्म्युलेशन) तपासते.
प्लॅटिनमआरएक्सची सध्या भारतभर नऊ वेअरहाऊस आहेत आणि कंपनी सुमारे 60 टक्के ऑर्डर 48 तासांच्या आत ग्राहकांपर्यंत पोहोचवते. देशभरात औषधांची उपलब्धता आणि डिलिव्हरीचा वेग आणखी वाढवण्यासाठी कंपनी आणखी सहा नवीन वेअरहाऊस सुरू करत आहे.
टीप: डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या ब्रँडऐवजी दुसरा पर्याय निवडण्यापूर्वी ग्राहकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विशेषतः दीर्घकालीन किंवा गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार घेत असताना ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे.


