Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedदैनिक भारत डायरी वर्धापन दिन सोहळा* *जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

दैनिक भारत डायरी वर्धापन दिन सोहळा* *जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते माजी उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर लोक सेवा पुरस्काराने सन्मानित*

*

पुणे दि. 24 :- पुणे येथील लोकप्रिय हिंदी दैनिक भारत डायरीच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोक सेवा पुरस्काराने माजी उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांचा सन्मान करण्यात आला.
दैनिक भारत डायरीचे सर्वेसर्वा स्वर्गीय अशोक अग्रवालजी यांच्या लोकाभिमुख कार्याचा गौरव करून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुद्रित माध्यमांद्वारे आजही पत्रकारीतेतील विश्वासार्हता दैनिक भारत डायरी सारख्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून टिकून असल्याचे मंत्री महोदय डॉ.विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच भारत डायरी द्वारा प्रकाशित विशेषांक ‘परिवर्तन द्वारे प्रगती ‘ या पुस्तिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, पुणे येथे या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी स्त्री शक्ती, वैद्यकीय सेवा, पत्रकारिता, समाजकार्य अशा विविध क्षेत्रातील 13 मान्यवरांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
भारत डायरी चे संपादक लवकुश तिवारी, आधार स्तंभ विनोद शिवनारायण बंसल, प्रबंध संपादक संजय गायकवाड, भारत डायरी चे अहिल्यानगर प्रतिनिधी वरिष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज,भाजपा प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, आरएसएस प्रचार मंडल सदस्य प्रकाश देशपांडे, प्रसिद्ध समाजसेवी उद्योगपति पवन सराफ, शिक्षण क्षेत्रात कार्यरत अशोक मिस्त्री, प्रसिद्ध ट्री मैन डॉ रमेश बंसल, सामाजिक कार्यकर्ता भीमराव पाटोळे,बाळासाहेब घोडके, स्व. अशोक अग्रवालजी यांच्या धर्मपत्नी श्रीमती प्रेमलता अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ता नीता अग्रवाल, सरस्वती जयकिशन गोयल, बिंदु तिवारी, प्रसिद्ध लेखक रणजीत सिंह अरोरा अर्श, जलसंपदा विभाग पुणे चे कार्यकारी अभियंता किरण देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
…….

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments