Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorized*कोथरुड विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण; ४ लाख ४८ हजार ५५ मतदारांची...

*कोथरुड विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण; ४ लाख ४८ हजार ५५ मतदारांची नोंद;प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध*

पुणे, दि. ३१ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील २१० कोथरुड विधानसभा मतदारसंघांमधील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

या कार्यक्रमापूर्वी या मतदार संघातील ४ लाख ४८ हजार ५५ मतदार होते. पुनरीक्षण प्रक्रियेत २ लाख ४० हजार ९५२ मतदारांनी गणना पत्रक भरून दिले असून, १ लाख ६६ हजार ८९० मतदार आढळून आलेले नाहीत. तसेच १९ हजार ९५६ मतदारांचे स्थलांतर झाले असून, १४ हजार ४१८ मतदार मयत असल्याचे आढळले आहे.

याशिवाय ४ हजार १५३ मतदारांची नावे दुबार असल्याचे, तर १ हजार ६८६ मतदार इतर कारणांसाठी वगळण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण २ लाख ७ हजार १०३ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. मात्र, २००२ च्या मतदार यादीशी जोडणी न झालेल्या तसेच मतदारांच्या तपशिलात तफावत आढळलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित मतदारांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांसह संबंधित नमुन्यांद्वारे अर्ज करून नाव मतदार यादीत समाविष्ट किंवा दुरुस्त करून घेता येणार आहे.

प्रारूप मतदार यादीवर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे दावे-हरकती सादर करता येतील. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन २९ ऑक्टोबर २०२६पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून, त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रारूप मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नाव असल्याची खात्री करून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments