Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ. हेडगेवार स्मृती ११ वी खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा* खुल्या गटात...

डॉ. हेडगेवार स्मृती ११ वी खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा* खुल्या गटात अविरत चौहान याला विजेतेपद; अर्णव कांगो, प्रद्योत मिश्रा उदयसिंह पाटील प्रीतीका नंदी व चंद्रकांत डोंगरे यांचीही अजिंक्यपदावर मोहोर

पुणे दिनांक ३० ऑगस्ट २०२६
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा भारती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. हेडगेवार स्मृती ११ व्या खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत अविरत चौहान याने खुल्या गटात विजेतेपद पटकाविले. अर्णव कांगो, प्रद्योत मिश्रा, उदयसिंह पाटील, प्रीतीका नंदी व चंद्रकांत डोंगरे यांनी अन्य गटात विजेतेपद पटकाविले.

बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दोनशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. खुल्या गटात चौहान, मिहीर सरवदे, यश वाटारकर, राघव पावडे व श्रीरंग बोंडाळे यांनी सातव्या फेरी अखेर प्रत्येकी सहा गुणांची कमाई केली प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे पहिले पाच क्रमांक देण्यात आले. अंश नायर, आरुष बडजादे, सौरभ परमार, राकेश मथियाझागन व श्रीकांत भोसले हे अनुक्रमे सहा ते दहा क्रमांकाचे मानकरी ठरले. महिलांच्या गटात प्रीतीका नंदी, मृण्मयी बागवे व समृद्धी वालंडे यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले.

या स्पर्धेतील बिगर मानांकित खेळाडूंच्या विभागात उदयसिंह पाटील, एस.अद्वय वैठीश्वरण, कपिल गजरमल, आयुष जेना, अथर्व देशपांडे यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकाविले. मुलांच्या दहा वर्षाखालील गटात अर्णव कांगो, ओजस चौकीदार रियांश शहा शिवम कयाल वरिया जयस्वाल यांना अनुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळाले. चौदा वर्षाखालील गटात प्रद्योत मिश्रा, चिराग रेड्डी, वरद दीक्षित, अभ्यागत जयस्वाल व अथर्व चढ्ढा हे अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकाचे मानकरी ठरले.

स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे व ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक डॉ. मकरंद वेलणकर यांच्या हस्ते झाले. या वेळी क्रीडा भारती चे महामंत्री राजजी चौधरी, तसेच विजय पुरंदरे, विनायक बापट, दीपक मेहेंदळे, विजय रजपूत, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जयंत गोखले, आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे आदी संघटक उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ विजय पुरंदरे, अनुजा दाभाडे,दीपक मेहेंदळे, जयसिंग जगताप,राजेंद्र शिदोरे यांच्या हस्ते झाला.
प्रमुख पंच म्हणून पवन कातकडे यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments