Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedकलाकाराने उपेक्षितांचा आवाज बनले पाहिजे* *-उर्गेंन आर्ट फेस्टिवल...

कलाकाराने उपेक्षितांचा आवाज बनले पाहिजे* *-उर्गेंन आर्ट फेस्टिवल मधील कलाकार परिसंवादामध्ये ज्येष्ठ कलावंतांचे मत*

 

 

पुणे : कलाकार म्हणून काम करत असताना आपल्यातील संवेदना कायम जागरूक ठेवल्या पाहिजे . आपण समाजाकडे संवेदनशील नजरेने पाहिले तर आपल्यातील कला अधिक बहरत जाते . समाजाचे केवळ मनोरंजन न करता समाजाला जागृत ठेवून समाजातील उपेक्षित वर्गाचे प्रश्न मांडून त्यांचा आवाज बनण्याचे काम कलाकाराने केले पाहिजे, असे आवाहन चित्रकला नाट्य आधी विविध क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंतांनी केले.

 

करुणादीप फाउंडेशन आणि त्रिरत्न वैरोचना सेंटर यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या उरगेन आर्ट फेस्टिवल फेस्टिवल मध्ये कलाकार परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते ,त्यावेळी जेष्ठ कलाकारांनी कलाकार आणि समाजाप्रती असणाऱ्या त्यांच्या भावना व्यक्त केला. ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, ज्येष्ठ चित्रकार मोगलान श्रावस्ती ,ज्येष्ठ चित्रकार सवी सावरकर, ज्येष्ठ रंगकर्मी संजय जीवने आधी या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते.

 

सुधारक ओलवे म्हणाले, पत्रकार म्हणून काम करत असताना माझी परिस्थिती अत्यंत गरीब होती. श्रीमंत लोकांच्या घरी जाऊन त्यांचे फोटो काढण्याचे माझे काम होते, ही परिस्थिती मनाला वेदना देणारे होती, त्यामुळे समाजाचे प्रश्न छायाचित्राच्या माध्यमातून मांडण्यासाठी मी काम सुरू केलं . देवदासी ,जाती व्यवस्था, मुलगी नको अशा प्रकारच्या मानसिकता माझ्या छायाचित्राच्या माध्यमातून आजपर्यंत मांडत आलो आहे. समाजाचे वास्तव माझ्या छायाचित्रांमध्ये मानले जात आहे यामध्ये मी समाधानी आहे.

सविंद्र सावरकर म्हणाले, कलाकार म्हणून मला जे माझ्या कलेच्या माध्यमातून मांडायचे आहे ते निश्चितपणे मांडतो. त्यासाठी मी कोणाचाही दबाव घेत नाही. कोणतीही विपरीत परिस्थिती आली तरी माझ्यातील कलाकाराला शांत बसू देत नाही, त्यामुळेच माझी कला समाजाला आणि विशेषता तरुणांना आकर्षित करत आहे.

 

संजय जीवने म्हणाले ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार न मांडणाऱ्याही अनेक नाटक तयार होतात परंतु ही एक प्रकारचे समाजाची अधोगती आहे . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचा समानतेचा विचार कलेच्या माध्यमातून मांडला गेला पाहिजे . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही 1936 मध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या खरा ब्राह्मण या नाटकाची समीक्षा केली होती, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज सुधारक या पलीकडे विविध प्रकारचे पहिले आहेत हे आपण जाणून घेतले पाहिजे.

 

मोगलाण श्रावस्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचा विचार मांडणाऱ्या अनेक लेण्यांचे आज दुरवस्था झाली आहे. आपण त्यांच्याकडे समाजाचा वारसा म्हणून पाहिले पाहिजे , परंतु आत्मा मग्न झालेला समाज हा लेण्यांपासून आणि त्यापासून मिळणाऱ्या शिक्षणापासून दूर गेला आहे. त्यामुळे समाजाचे अधोगती सुरू आहे.कलाकार म्हणून चित्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन करता येईल ही माझी निश्चित भावना आहे. चित्रकला ही केवळ मनोरंजनासाठी नावे तर त्यातून समाजशिक्षणही झाले पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments