पुणे,3 सप्टेंबर 2026 : बर्जर पेंटस् इंडिया लि.ने आर्थिक वर्ष 2026 मध्ये आपल्या कन्स्ट्रक्शन केमिकल्स व्यवसायात 1500 कोटी रूपयांचा टप्पा पार केला आहे.यामध्ये वॉटर प्रुफिंगचाही समावेश आहे. या कामगिरीमुळे कंपनीच्या मुळ पेंटस् व्यवसायापलीकडील वाढत्या अस्तित्वाला बळकटी मिळाली आहे.
गेल्या 7 ते 8 वर्षांत उभारल्या गेलेल्या या व्यवसायाचा विस्तार वॉटर प्रुफिंग,रिपेअर,टायलिंग आणि बांधकामाशी संबंधित इतर क्षेत्रापर्यंत झाला आहे.याचे कारण नवीन बांधकाम आणि दुरूस्तीच्या कामांमध्ये विशेष कन्स्ट्रक्शन केमिकल्सची मागणी वाढत आहे.या व्यवसायाने गेल्या तीन वर्षात 25 टक्क्यांहून अधिक चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (सीएजीआर) नोंदविला आहे.


