Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedस.प. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात दोन दिवसीय राष्ट्रीय व्याख्यान व पोस्टर सादरीकरण स्पर्धा* ...

स.प. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात दोन दिवसीय राष्ट्रीय व्याख्यान व पोस्टर सादरीकरण स्पर्धा*  स्पर्धकांना विनामूल्य प्रवेश ; दि. ८ व ९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजन 

.

 

पुणे : सर परशुरामभाऊ महाविदयालयातील रसायनशास्त्र विभाग व इंगळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ. टी.आर. इंगळे यांच्या स्मरणार्थ दि. ८ व ९ सप्टेंबर २०२६ रोजी रसायनशास्त्र विषयातील संशोधनपर व्याख्यान व पोस्टर सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयातील संशोधक, पदवी/पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. सुनीता जाधव, रसायनशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. वंदना आरबाळे-तोरणे, समन्वयक डॉ. दिनेश गरुड व डॉ. प्रणव चंद्रचूड यांनी केले आहे.

 

कै. टी. आर. इंगळे यांच्या कुटुंबीयांकडून दरवर्षी व्याख्यान व पोस्टर सादरीकरण स्पर्धेतील संशोधक विद्यार्थी गट व पदव्युत्तर विद्यार्थी गटात प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना एकूण रोख रक्कम ५० हजार रुपयांचे बक्षीस वितरण होणार आहे. रोख रक्कम व सन्मानपत्र स्वरुपात बक्षीसे दिली जातात. स्पर्धेकरिता प्रवेश विनामूल्य असून इंगळे परिवाराकडून कै. टी. आर. इंगळे यांचे चिरंजीव मुकुंद व जयंत इंगळे (अमेरिका) यांनी सर्व विद्यार्थ्यांना उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

कै. डॉ. टी.आर इंगळे हे सर परशुरामभाऊ महाविद्‌यालयाचे माजी विद्यार्थी व प्राध्यापक म्हणून संलग्न होते. त्यांना संशोधनाची खूप आवड होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर अनेक संशोधनपर शोध निबंध प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या या संशोधन वृत्तीमुळे त्यांना राष्ट्रीय प्रयोगशाळा पुणे व परडिऊ विद्यापीठ, अमेरिका येथे प्राध्यापक व शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

 

सन २०२६ हे त्यांच्या पुण्यतिथीचे ३१ वे वर्ष असून त्यांच्या संशोधनातील योगदानाची आठवण म्हणून या वर्षी ‘केमिस्ट्री : शेपिंग ए बेटर टुमारो’ (Chemistry: Shaping a better tomorrow) या मुख्य विषयावर रसायनशास्त्र विभागाकडून लेक्चर व पोस्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेबद्दलच्या अधिक माहितीसाठी www.spcollegepune.ac.in. या संकेतस्थळवर भेट देण्याचे अवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments