Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सतर्फे द्रोणाचार्य दिन २०२६ उत्साहात साजरा शिक्षकांच्या योगदानाला...

प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सतर्फे द्रोणाचार्य दिन २०२६ उत्साहात साजरा शिक्षकांच्या योगदानाला अभिवादन, सांस्कृतिक वारशाचे दर्शन आणि गुणवंत शिक्षकांचा गौरव

 

‘अनुभव’च्या प्रकाशनासह माजी विद्यार्थ्यांच्या संदेशांनी, सांस्कृतिक सादरीकरणांनी आणि विविध पुरस्कारांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव

ठळक मुद्दे

चिखली येथील टाऊन हॉलमध्ये द्रोणाचार्य दिन २०२६ उत्साहात साजरा; प्रियदर्शनी परिवारातील शिक्षक व शिक्षकेतर सदस्यांची उपस्थिती

‘अनुभव’ या विशेष संग्रहाचे प्रकाशन; शिक्षकांचे वास्तव जीवनातील अनुभव, भावना आणि आठवणींमधून त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाला उजाळा

माजी विद्यार्थ्यांच्या संदेशांद्वारे शिक्षकांनी घडवलेल्या आयुष्याचा गौरव; संस्थापक कै. श्री. इंद्रमन सिंग यांच्या दूरदृष्टीला अभिवादन

‘फोक हेरिटेज ऑफ इंडिया’ या संकल्पनेतून भारताच्या विविधतेचे दर्शन; शिक्षकांच्या सादरीकरणांना ‘आचार्य नृत्य पुरस्कार’ने गौरव

नेतृत्वातील उत्कृष्टता, वर्षातील सर्वोत्कृष्ट शिक्षक, नाविन्यपूर्ण शिक्षक, प्रशासकीय कामगिरी आणि जीवनगौरव अशा विविध पुरस्कारांनी शिक्षकांचा सन्मान

महाराष्ट्र, ५ सप्टेंबर २०२६: प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सचा वार्षिक शिक्षक दिन सोहळा ‘द्रोणाचार्य दिन २०२६’ चिखली येथील टाऊन हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिक्षकांप्रती कृतज्ञता, त्यांच्या कार्याची आठवण आणि योगदानाचा गौरव या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात संस्थेतील शिक्षक तसेच प्रियदर्शनी परिवारातील सदस्य एकत्र आले. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षकांच्या समर्पणाचा गौरव वैयक्तिक अनुभव, माजी विद्यार्थ्यांचे संदेश, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विविध पुरस्कारांच्या माध्यमातून करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. जितेंद्र सिंग, व्यवस्थापकीय विश्वस्त, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्स, म्हणाले, “प्रत्येक शैक्षणिक संस्थेच्या केंद्रस्थानी शिक्षक असतात. त्यांचा प्रभाव केवळ अभ्यासक्रम आणि शैक्षणिक ज्ञानापुरता मर्यादित नसतो; ते विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात, योग्य दिशा दाखवतात आणि त्यांच्यात आयुष्यभर उपयोगी पडणारी मूल्ये व आत्मविश्वास निर्माण करतात. द्रोणाचार्य दिनाच्या माध्यमातून आमच्या शिक्षकांचे हे योगदान अधोरेखित करण्याची, त्यांच्या प्रवासाचा गौरव करण्याची आणि शाळेसाठी दररोज देत असलेल्या समर्पित सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते.”

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते ‘अनुभव’ या विशेष संग्रहाचे प्रकाशन. प्रियदर्शनीच्या विविध शाखांतील शिक्षकांनी सांगितलेल्या वास्तव जीवनातील कथा, अनुभव आणि आठवणी या संग्रहातून समोर आल्या. शिक्षकांच्या व्यावसायिक प्रवासातील भावनिक आणि प्रेरणादायी पैलूंना या माध्यमातून मनापासून दाद देण्यात आली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचे नातेही यावेळी प्रकर्षाने समोर आले. माजी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ संदेशांच्या माध्यमातून आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यात शिक्षकांनी बजावलेल्या भूमिकेचे स्मरण केले.

संस्थेचे संस्थापक कै. श्री. इंद्रमन सिंग यांनाही यावेळी आदरांजली वाहण्यात आली. सर्वांसाठी सुलभ, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि युवक सक्षमीकरण यांसाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न आजही प्रियदर्शनीच्या शैक्षणिक वाटचालीचा महत्त्वाचा आधार आहे. तसेच प्रियदर्शनी परिवारातील लाडक्या शिक्षिका कै. सुश्री अविता सिल्वेरा यांच्या स्मरणार्थ उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमात संस्थेच्या नेतृत्वाचाही गौरव करण्यात आला. विश्वस्त आणि प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच ‘हेल्पिंग हँड पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘फोक हेरिटेज ऑफ इंडिया’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक सादरीकरणातून शिक्षकांनी भारतातील विविध प्रादेशिक परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वैविध्याचा सुंदर आविष्कार घडवला. या सादरीकरणांतील सहभागींना ‘आचार्य नृत्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

सोहळ्याच्या समारोपाच्या टप्प्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. नेतृत्वातील उत्कृष्टता, वर्षातील सर्वोत्कृष्ट शिक्षक, नाविन्यपूर्ण शिक्षक आणि प्रशासकीय कामगिरी अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. दीर्घकाळ केलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी अनिता नायर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सविषयी

प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्स ही मूल्याधिष्ठित आणि सर्वसमावेशक शिक्षण देणारी चार दशकांहून अधिक काळाची शैक्षणिक संस्था आहे. १९८२ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचा आज १४ हून अधिक शाखांचा विस्तार झाला असून, १७,००० हून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. संस्थेने माजी विद्यार्थ्यांचा भक्कम परिवारही उभा केला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, भविष्यासाठी आवश्यक शिक्षण आणि बालकेंद्रित दृष्टिकोन यांवर भर देत संस्था शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत जीवनकौशल्ये, तंत्रज्ञान आणि सहशालेय उपक्रमांचा समतोल साधते. भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणाऱ्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीसाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे.

अधिक माहितीसाठी: https://priyadarshanischools.org/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments