पुणे, दि.१०: जलसंपदा विभागातील विशेष कौशल्य व गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या अभियंत्यांना राज्यपाल कृष्णदेव वर्मा यांच्या हस्ते वैयक्तिक व सांघिक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम बुधवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कोयना संकल्पचित्र मंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता गीता सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
०००


