हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल आणि स्कूटरच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने आज बहुप्रतिक्षित इंटिग्रेटेड-एबीएस असलेल्या ग्लॅमर एक्सच्या लाँचची घोषणा केली. उद्योगात नवा आदर्श प्रस्थापित करत, ग्लॅमर एक्स १२५ सीसी सेगमेंटमध्ये सिंगल-चॅनेल एबीएससह इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम (आयबीएस) असणारी पहिली मोटरसायकल ठरली आहे. हे वैशिष्ट्य मोटरसायकलची स्थिरता मोठ्या प्रमाणात वाढवते आणि ब्रेकिंगचे अंतर कमी करते. यासह प्रगत तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याप्रती आणि रायडर-केंद्रित मोबिलिटी सोल्यूशन्स देण्याप्रती हिरो मोटोकॉर्पची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
या लाँचप्रसंगी मत व्यक्त करत हिरो मोटोकॉर्पच्या इंडिया बिझनेस युनिटचे चीफ बिझनेस ऑफिसर आशुतोष वर्मा म्हणाले, “१२५ सीसी सेगमेंटमध्ये झपाट्याने बदल होत आहेत, जिथे ग्राहक आधुनिक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि तडजोड न केलेल्या सुरक्षेच्या संयोजनाची मागणी करत आहेत. ग्लॅमर एक्सने राइड मोड्स आणि क्रूझ कंट्रोलसारख्या श्रेणीतील पहिल्या वैशिष्ट्यांसह या क्षेत्रात आधीच क्रांती घडवून आणली आहे. या सेगमेंटमधील पहिली इंटिग्रेटेड एबीएस आणून आम्ही केवळ मोटरसायकल अपग्रेड करत नाही आहोत, तर संपूर्ण श्रेणीच्या सुरक्षेच्या मानकांना नवा आकार देत आहोत. हे लाँच आमच्या पोर्टफोलिओला अधिक दृढ करते आणि भारतामधील आजच्या काळातील रायडर्सना सक्षम करणारे इंटेलिजंट आणि भविष्यसज्ज मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करते.”
एबीएससह अधिक सुरक्षितता
ग्लॅमर एक्स १२५ मध्ये पहिल्यांदाच इंटिग्रेटेड अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम तंत्रज्ञान देण्यात आले आहे, जे विविध रस्त्यांच्या परिस्थितीमध्ये अधिक प्रभावी, जलद प्रतिसाद देणारी आणि खात्रीशीर ब्रेकिंग क्षमता प्रदान करते. हे वैशिष्ट्य ग्लॅमर एक्सच्या आधीपासून असलेल्या सुरक्षा यंत्रणेमध्ये भर घालते, ज्यामध्ये पॅनिक ब्रेक अलर्ट – इमर्जन्सी ब्रेक लावल्यास मागील वाहनांना त्वरित सावध करण्यासाठी वेगाने लुकलुकणारे एलईडी विंकर्स आणि आणीबाणीचा इशारा देण्यासाठी हॅझार्ड लॅम्प्सचा समावेश आहे.
भविष्यवेधी स्टाइलिंग आणि आकर्षक डिझाइन शैली
ग्लॅमर एक्स १२५ शक्तिशाली, सुबक डिझाइन शैलीसह येते, जी रस्त्यावर आपली मोटरसायकल उठून दिसावी अशी इच्छा असणाऱ्या रायडर्ससाठी खास डिझाइन करण्यात आली आहे. ‘एच’ सिग्नेचरसह फुल एलईडी लाइटिंग पॅकेज आणि स्पोर्टी ग्राफिक्स या मोटरसायकलला रस्त्यावर वेगळी ओळख मिळवून देतात.
स्मार्ट तंत्रज्ञान आणि कनेक्टेड राइडिंग
आकर्षण अधिक वाढवण्यासाठी या मोटरसायकलमध्ये १०.७ सेमी अॅडॉप्टिव्ह मल्टि-कलर कन्सोल दिला आहे, जो अॅम्बियंट लाइटिंगसह येतो आणि त्यात ६० हून अधिक वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये गिअर शिफ्ट अॅडव्हायझरी, डिस्टन्स-टू-एम्प्टी आणि रिअल-टाइम मायलेज इंडिकेटर यांचा समावेश आहे. रायडर्स ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ईटीए डिस्प्लेसह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, तसेच कॉल आणि एसएमएस अलर्ट्सद्वारे कनेक्ट राहू शकतात, ज्यामुळे या सेगमेंटमध्ये खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानावर आधारित राइडिंगचा अनुभव मिळतो.
कामगिरी आणि कार्यक्षमता
इंटिग्रेटेड एबीएससह येणाऱ्या ग्लॅमर एक्स १२५ मध्ये स्प्रिंट-ईबीटी इंजिन देण्यात आले आहे, जे ८२५० आरपीएमवर ११.४ बीएचपी (८.५ किलोवॅट) पॉवर देते. हे इंजिन सुरळीत पॉवर डिलिव्हरी आणि कमी एनव्हीएचसाठी डिझाइन केले आहे. रायडर्स वेगवेगळ्या राइडिंगच्या गरजांनुसार इको, रोड आणि पॉवर या तीन राइड मोड्समधून निवड करू शकतात. क्रूझ कंट्रोल प्रवासातील थकवा कमी करते आणि लांबच्या प्रवासात इंधनाची बचत वाढवते.
सुविधा आणि आराम
दैनंदिन प्रवासातील सुलभतेसाठी डिझाइन केलेल्या ग्लॅमर एक्स १२५ मध्ये आरामदायी बसण्याच्या स्थितीसाठी (रायडिंग पोश्चर) रुंद हँडलबार, लांब सपाट आरामदायक सीट आणि सहज पोहोचता येईल अशी कमी सीट उंची दिली आहे. रायडरच्या सुविधेमध्ये भर घालण्यासाठी सी-टाइप यूएसबी चार्जिंग पोर्टसह सीटखाली ड्युअल मोबाइल स्टोरेज उपलब्ध आहे.
रंग आणि किंमत
आपल्या भविष्यवेधी डिझाइनला शोभून दिसावे म्हणून एबीएस असलेली ग्लॅमर एक्स १२५ दोन नवीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आली आहे – गन मेटल ग्रे आणि मॅट अॅक्सिस ग्रे. याशिवाय ब्लॅक पर्ल रेड आणि ब्लॅक टील ब्लू हे दोन आधीचे रंगही उपलब्ध आहेत, यामुळे ग्लॅमर एक्सच्या नेक्स्ट-जनरेशन रंगांची श्रेणी अधिक विस्तारली आहे. हा नवीन व्हेरिएंट देशभरातील हिरो मोटोकॉर्पच्या डीलरशिप्सवर १,०१,००० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) या आकर्षक किमतीत उपलब्ध आहे.


