मुंबई, 15 सप्टेंबर 2026: इन्व्हेस्को म्युच्युअल फंडाने आज इन्व्हेस्को इंडिया निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड (निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्सचे अनुकरण करणारी ओपन-एंडेड योजना) आणि इन्व्हेस्को इंडिया निफ्टी केमिकल इंडेक्स फंड (निफ्टी केमिकल इंडेक्सचे अनुकरण करणारी ओपन-एंडेड योजना) सुरू करण्याची घोषणा केली. भारतातील दीर्घकालीन संरचनात्मक आणि धोरणाधारित वाढीच्या प्रवाहांचा लाभ घेणाऱ्या दोन क्षेत्रांमध्ये सहभागी होण्याची संधी या योजना गुंतवणूकदारांना देतात.
ट्रॅकिंग एररच्या अधीन राहून, इन्व्हेस्को इंडिया निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्सच्या रचनेची प्रतिकृती तयार करून इक्विटी आणि इक्विटी-संबंधित सिक्युरिटीजमध्ये पॅसिव्ह गुंतवणूक करेल. भारताच्या संरक्षण परिसंस्थेचा अविभाज्य भाग असलेल्या कंपन्यांना हा इंडेक्स एक्सपोजर प्रदान करतो, ज्यामध्ये एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादक, संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या, जहाज बांधणी कंपन्या, स्फोटक उत्पादक आणि संबंधित व्यवसायांचा समावेश आहे.
ट्रॅकिंग एररच्या अधीन राहून, ही योजना बेंचमार्कच्या कामगिरीनुसार परतावा मिळवण्याच्या प्रयत्नाने, निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्सचे घटक असलेल्या कंपन्यांमध्ये इंडेक्सच्या समान वेटेजमध्ये गुंतवणूक करेल.
इनव्हेस्को इंडिया निफ्टी केमिकल इंडेक्स फंड हा निफ्टी केमिकल इंडेक्सच्या रचनेचे अनुकरण करून इक्विटी आणि इक्विटी-संबंधित सिक्युरिटीजमध्ये ट्रॅकिंग एररच्या अधीन राहून ‘पॅसिव्ह’ गुंतवणूक करेल. निफ्टी केमिकल इंडेक्समध्ये स्पेशालिटी केमिकल्स, ॲग्रोकेमिकल्स, कमोडिटी केमिकल्स, खते, औद्योगिक वायू, स्फोटके आणि संबंधित क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे; यामुळे भारताच्या रासायनिक क्षेत्रातील विविध उप-क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
निफ्टी केमिकल इंडेक्सचा भाग असलेल्या कंपन्यांमध्ये, त्या इंडेक्समधील त्यांच्या भारांकानुसार ही योजना गुंतवणूक करेल. ट्रॅकिंग एरर विचारात घेऊन, बेंचमार्कच्या कामगिरीशी सुसंगत परतावा मिळवणे हे या योजनेचे उद्दिष्ट असेल.
संरचनात्मक सुधारणा, वाढती देशांतर्गत मागणी, उत्पादन-क्षेत्रावर आधारित विकास आणि धोरणात्मक तसेच औद्योगिक स्वावलंबनावर दिलेला विशेष भर यामुळे भारताच्या विकासाची वाटचाल अविरत सुरू आहे. वाढता संरक्षण खर्च, स्वदेशीकरणाचे उपक्रम आणि निर्यातीच्या वाढत्या संधींचा लाभ संरक्षण क्षेत्राला मिळतो आहे; तर दुसरीकडे, वाढता देशांतर्गत वापर, मूल्य-वर्धित उत्पादन आणि जागतिक पुरवठा साखळीतील विविधता यांचा रासायनिक क्षेत्राला फायदा होत आहे. इनवेस्को इंडिया निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड आणि इनवेस्को इंडिया निफ्टी केमिकल इंडेक्स फंड हे दोन्ही फंड अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत की, त्याद्वारे गुंतवणूकदारांना पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगच्या माध्यमातून दीर्घकालीन विकासाच्या दोन क्षेत्रांमध्ये पारदर्शक आणि किफायतशीर गुंतवणूक करता येईल. या दोन्ही योजनांचे व्यवस्थापन अभिषेक बाहिनीपती यांच्याद्वारे केले जाईल.
दोन्ही योजनांसाठी एनएफओ दरम्यान गुंतवणुकीची किमान रक्कम ₹100 आहे आणि त्यानंतर ती ₹1 च्या पटीत करता येईल. एसआयपी गुंतवणुकीसाठी, दोन्ही योजनांमध्ये दैनिक (डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे किमान ₹20), साप्ताहिक (किमान ₹100), मासिक (किमान ₹100) आणि त्रैमासिक (किमान ₹300) असे पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी कोणतेही एक्झिट लोड आकारले जाणार नाही.
या न्यू फंड ऑफर्स आजपासून (15 सप्टेंबर 2026) गुंतवणुकीसाठी खुल्या झाल्या आहेत आणि त्या 29 सप्टेंबर 2026 रोजी बंद होतील.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन आहे; योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.


